शैक्षणिक

जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत आयोजित स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

The prize distribution ceremony of the competition


By nisha patil - 10/17/2025 3:44:05 PM
Share This News:



 जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत आयोजित  स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रदर्शनाला जिल्हाधिकाऱ्यांकडून सन्मान

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दसऱ्याच्या निमित्ताने विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये प्लास्टिक मुक्ती, पथनाट्य, निबंध, चित्रकला यासारख्या स्पर्धांचा समावेश होता. विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली कला सादर केली आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कार्तिकेयन एस यांच्या उपस्थितीत मानपत्र सन्मानचन्ह देऊन गौरव करण्यात आला.

सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागासह शिक्षक, पालक आणि शाळा प्रतिनिधी देखील उपस्थित होते. यावेळी अनेक शाळांनी या स्पर्धेमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व सामाजिक विषयांबाबत जागरूकता वाढीस लागल्याचे दिसून आले.


जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत आयोजित स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
Total Views: 44