बातम्या
उचगांव पुलाखालून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर;
By nisha patil - 4/15/2025 4:03:00 PM
Share This News:
उचगांव पुलाखालून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर;
शिवसेनेची तातडीने उपाययोजनांची मागणी
उचगांव हायवे पुलाखाली गटारी तुंबल्याने वाहतुकीची गंभीर कोंडी निर्माण होत असून, गटारी अंडरग्राऊंड करावी व हायवेच्या कामामुळे गांधीनगर नळ पाणी योजनेच्या पाइपलाईनला धक्का लागू नये, अशी मागणी करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे प्राधिकरण अभियंता महेश पाटोळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी अधिकाऱ्यांनी तातडीने ठेकेदारांना बोलावून योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, उपतालुकाप्रमुख राहुल गिरूले, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष दत्ता फराकटे, तसेच शरद माळी, कैलास जाधव, सचिन नागटिळक, बाळासाहेब नलवडे, मोहन रजपूत, किशोर कामरा, सुनील पारपाणी, दीपक फ्रेमवाला, बाबुराव पाटील, प्रफुल्ल घोरपडे, संदीप शेटके, तौफिक पठाण आदींचा सहभाग होता.
उचगांव पुलाखालून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर;
|