शैक्षणिक
इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ' सीईटी 2026 ' करिता ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू
By nisha patil - 1/14/2026 12:48:56 PM
Share This News:
कोल्हापूर:- शैक्षणिक वर्ष 2026- 27 मध्ये इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन सीईटी परीक्षेकरता नोंदणी सुरू झाली असून, नोंदणीसाठी अपार आयडी आणि आधार आयडी बंधनकारक आहे. बारावी सायन्समधून उत्तीर्ण झालेल्या किंवा सध्या बारावी सायन्स मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी,कोल्हापूर येथे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कक्षही सुरू आहे, अशी माहिती श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी दिली.
स्टेट सीईटी सेल , महाराष्ट्र यांचेकडून दरवर्षी विविध अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. सेलचे अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर पीसीबी आणि पीसीएम अशा दोन्ही ग्रुपचे इच्छुक विद्यार्थी इंजिनिअरिंग सीईटीसाठी दिनांक 10 जानेवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नोंदणी करू शकतात. परीक्षेच्या अंदाजित तारखा 11 एप्रिल ते 26 एप्रिल, 2026 तसेच 10 मे ते 17 मे 2026 अशा असून, महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ही परीक्षा पार पडेल.
ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अपार आयडी निर्माण केलेला नाही त्यांनी डिजीलॉकर ॲपमधून तो निर्माण करावा, तसेच, फॉर्म भरण्याच्या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इन्स्टिट्यूटचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. प्रवीण देसाई (750 751 4600) यांना संपर्क करावा.
इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ' सीईटी 2026 ' करिता ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू
|