बातम्या
रोजरी चर्च, आजरा येथे मारिया मातेची मिरवणूक भक्तिभावाने,उत्साहाने प्रार्थनामय वातावरणात संपन्न.
By nisha patil - 10/26/2026 1:47:29 PM
Share This News:
रोजरी चर्च, आजरा येथे मारिया मातेची मिरवणूक भक्तिभावाने,उत्साहाने प्रार्थनामय वातावरणात संपन्न.
आजरा(हसन तकीलदार)*:-रोजरी चर्च आजरा व संपूर्ण धर्मग्रामात ऑक्टोबर महिना हा रोजरी मातेच्या प्रार्थनेचा महिना म्हणून साजरा केला जात आहे.
याची सांगता आज रविवार दिनांक २५/१०/२०२६ रोजी आजरा शहरात मिरवणूक काढून करण्यात आली.या प्रसंगी सिंधुदुर्ग धर्म प्रांताचे नूतन महागुरू स्वामी वंदनीय आग्नेलो पिन्हेरो उपस्थित होते.
त्यांचे स्वागत चाफे गल्ली येथे करण्यात आले.या प्रसंगी रोजरी शाळेच्या मुलींच्या लेझीम पथकाने प्रात्यक्षिक सादर केले वएम सी सी च्या छात्रांनी कवायतीचे संचलन केले.नंतर चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आली.
त्यानंतर मारिया मातेच्या मूर्तीची सजवलेल्या जीपवरून आजरा शहरातून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी मुलींनी प्रार्थना नृत्य सादर केले.याचेच फादर विल्यम डिसोझा यांनी बायबल मधील वचनांच्या आधारे शुभवर्तमानाचे प्रकटन केले व विश्व कल्याणासाठी व जागतिक शांततेसाठी प्रार्थना केली.इनास फर्नांडिस यांनी सर्वांसाठी विशेष प्रार्थना केली.
यावेळी धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरु फादर मेल्विन,सहाय्यक धर्मगुरु फादर वॉल्विन, ब्रदर जीतन यांनी व पॅरिश पास्टरल कौन्सिल सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी वाटंगी , गवसे, धनगरमोळा, खानापूर, पेरणोली, साळगाव, हालेवाडी, दाभील, शेळप , खेडगे येथील ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.
यावेळी अल्बर्ट सर यांनी सर्वांना जेवणाची व्यवस्था केली होती.
रोजरी चर्च, आजरा येथे मारिया मातेची मिरवणूक भक्तिभावाने,उत्साहाने प्रार्थनामय वातावरणात संपन्न.
|