विशेष बातम्या

*वनविभागाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

The protest has been temporarily suspended


By nisha patil - 10/15/2025 3:53:39 PM
Share This News:



*वनविभागाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित
 

आजरा(हसन तकीलदार):-आपल्या विविध मागण्यासाठी तसेच हत्तीच्या वास्तव्याला कंटाळून घाटकरवाडी, धनगरमोळा, सुळेरान, किटवडे, आंबाडे या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी सलग दोन दिवस आंदोलन सुरु केले होते. पहिल्यांदा चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सहाय्य्क वनसंरक्षक विलास काळे यांनी आंदोलकांच्या स्थानिक व आपल्या अख्त्यारितील काही मागण्या पूर्ण करण्याची हमी देऊन अन्य धोरणात्मक मागण्याबाबत वरीष्ठाशी बैठक लावून मार्ग काढण्याची लेखी हमी दिल्यानंतर तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांनी हत्ती संगोपन केंद्र, तारेचे कुंपण, अतिवृष्टी कर्जमाफी आदिबाबत लवकरच बैठक घेणार असले बाबत मोबाईलवरून सांगितलेनंतर दोन दिवस सुरु असलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
   

 वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन सावंत यांनी आंदोलकांच्या मागण्यांच्याबाबत सविस्तर लेखी पत्र दिले यामध्ये म्हटले आहे की, हत्ती, गवारेडा व अन्य वन्यप्राणी जेव्हा जेव्हा नागरी वस्तीत किंवा शेतात येतात तेव्हा वनविभाग हत्ती हाकारा टीमच्या मदतीने त्यांना नैसर्गिक अधिवासात पाठवण्याचे काम करीत आहे. तसेच वार्षिक भाडेपट्ट्याने जमिनी घेणेबाबत निर्णय अथवा धोरण हे शासन स्तरावरील आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करीत आहोत. आपले ग्रामपंचायतिकडून ग्रामसभेचा हत्ती ग्रामसंगोपन केंद्र उभारणीबाबतचे ठराव प्राप्त होताच त्याबाबत वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करण्याची तजवीज करीत आहोत. शासन निर्णयामध्ये नमूद केलेप्रमाणे नुकसान भरपाई देणेत येईल. शासन स्तरावरील धोरणाबाबत वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करण्यात येईल त्याचप्रमाणे इतर मागण्याबाबतही खुलासेवार लेखी पत्र देण्यात आले आहे.
   

दरम्यान आजरा कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई, शिवसेना उबाठाचे तालुकाध्यक्ष युवराज पोवार, भारती जाधव यांनी भाषणे केली तर भाजपचे तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, दशरथ अमृते, अनिल फडके, रमेश रेडेकर आदिनी आंदोलनस्थळी भेट दिली. कारखान्याचे संचालक गोविंद पाटील, संग्राम पाटील, जयसिंग पाटील, संजय अडकूरकर, नितीन पाटील,सहदेव प्रभू, गंगाराम डेळेकर आदिनी आंदोलनाची धुरा सांभाळली.


*वनविभागाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित
Total Views: 231