बातम्या

संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनाचा फटका जनता भोगत आहे -डॉ. स्मिता कुंभार

The public is suffering due to the wrong planning


By Administrator - 1/4/2026 12:43:01 PM
Share This News:



संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनाचा फटका जनता भोगत आहे -डॉ. स्मिता कुंभार
 

आजरा(हसन तकीलदार):-आजरा शहराच्या अमृतजल पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन गांधीनगर ओढ्यापासून ते आयडीयल कॉलनीपर्यंत रस्त्याच्या मधोमध घातली होती त्याचप्रमाणे रस्ता हद्द सोडून सुमारे 7 ते 8 फूट आत गटारीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे रस्ता अरुंद झाला होता तसेच गटारीच्या बाहेरील मोकळ्या जागेत अतिक्रमण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत अन्याय निवारण समितीने पाठपुरावा करून यश मिळवले.
     

याबाबत मागील तीन वर्षापासून अन्याय निवारण समितीने पाठपुरावा करून यामध्ये यश मिळवले आहे ही खरोखर स्तुत्य बाब आहे. सद्या रस्ता हद्दीपर्यंत नवीन गटर बांधण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर अमृतजल योजनेची मुख्य पाईप लाईन गटारीलगत घालायचे काम सुरु आहे. परंतु याचा फटका मात्र सामान्य जनताच भोगत आहे. सुरवातीलाच जर संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य व नियोजनबद्ध काम करून घेतले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. ऐन उन्हाळ्यात गेले तीन चार दिवस पाणी पुरवठा ठप्प आहे.

त्यामुळे लोकांना टँकरने पाणी विकत आणून गरज भागवावी लागत आहे. परंतु ज्या ठिकाणी टँकर जात नाही व पाण्याचे कोणतेही साधन व स्त्रोत्र उपलब्ध नाही त्यांनी काय करायचे? त्यावेळच्या संबंधित जबाबदार अधिकारी व इतरांनी सुनियोजित काम केले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. त्यांच्या चुकीचा फटका सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत आहे असे मत नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
     तर नगरसेवक बामणे भाऊजी म्हणाले की, ज्या चुका झाल्या होत्या त्या घेऊन पालकमंत्री आबिटकरसाहेबांच्या समोर विषय मांडला. पालकमंत्र्यांनी सबंधित ठेकेदाराला बोलावून घेऊन त्यांना स्पष्ट सांगितले की, जी गटर आत आली आहे ती शिफ्ट करा आणि पाण्याची पाईप लाईन जी मधोमध घातलीय तीपण बाजूला घालून काम पूर्ण करून घ्या. त्याप्रमाणे आता हे काम मागील दोन तीन दिवसापासून सुरु आहे.
   

ठेकेदार सुपरवायझर रमेश गस्ती म्हणाले की, मागील दोन तीन दिवसापासून अगदी युद्धपातळीवर काम सुरु आहे. रात्रंदिवस काम करून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. रात्री आणि दिवसा दोन शिफ्टमध्ये काम सुरु आहे. मधी दगड लागल्यामुळे कामाला उशिरा झाला तरीसुद्धा ते दगड फोडून आम्ही पाईप लाईन व्यवस्थित घालून लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. याबाबत नगरसेवक असिफ सोनेखानही वेळोवेळी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन माहिती घेत आहेत.


संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनाचा फटका जनता भोगत आहे -डॉ. स्मिता कुंभार
Total Views: 495