बातम्या

वैशाखात गुलमोहराचा गारवा पांथस्थांना दिलासा

The rain of Gulmohar in Vaishakha brings relief to the devotees


By nisha patil - 9/5/2025 3:29:52 PM
Share This News:



वैशाखात गुलमोहराचा गारवा पांथस्थांना दिलासा

 रणरणत्या उन्हात गुलमोहरच्या फुलांनी रस्त्यांवर साकारलं सौंदर्य

वैशाख वणव्याच्या काहिलीने अंगाची लाही लाही होत असताना, रस्त्यांवर गुलमोहराच्या लालसर फुलांनी सौंदर्य फुलवले आहे. बोरपाडळे-वारणानगर तसेच बांबवडे रस्त्यावर फुललेला गुलमोहर पांथस्थांना डोळ्यांचे व मनाचे समाधान देतो आहे.

गुलमोहराच्या झाडांची फुले वाऱ्याच्या झुळुकीने खाली पडत रस्त्यावर लाल गालिचा पसरल्याचा भास निर्माण करत आहेत. कृत्रिम थंडावा शोधणाऱ्या प्रवाशांना गुलमोहर नैसर्गिक गारवा देत आहे. 1 मे रोजी ‘गुलमोहर दिन’ साजरा करत या वृक्षाचे सौंदर्य अधोरेखित करण्यात आले. गुलमोहराचा हा मनोहारी देखावा पांथस्थांना थांबून पाहायला लावतो आहे.


वैशाखात गुलमोहराचा गारवा पांथस्थांना दिलासा
Total Views: 108