बातम्या

अंबाबाई मंदिर विकास आराखड्यात बाधितांचे पुनर्वसन स्थानिक पातळीवरच करावे – संघटनेची मागणी

The rehabilitation of those affected by the Ambabai Temple


By nisha patil - 12/9/2025 2:53:48 PM
Share This News:



अंबाबाई मंदिर विकास आराखड्यात बाधितांचे पुनर्वसन स्थानिक पातळीवरच करावे – संघटनेची मागणी

सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांना बाधित नागरिक-व्यावसायिकांचे निवेदन

श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यात बाधित होणाऱ्या व्यावसायिक व रहिवाशांनी आपले पुनर्वसन याच ठिकाणी करावे, अन्यथा आराखड्याला तीव्र विरोध करावा लागेल, असा इशारा दिला आहे.

मंदिर परिसर विकास आराखड्यामुळे शेकडो कुटुंबांचे कायमस्वरूपी विस्थापन होणार असल्याची भीती बाधित नागरिक व व्यावसायिकांनी व्यक्त केली. "आमचे व्यवसाय मंदिरात येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहेत. विस्थापन झाल्यास आम्ही देशोधडीला लागू," असे निवेदनात म्हटले आहे.

या संदर्भात मंदिर परिसर विकास आराखडा बाधितांची संघटना यांनी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांना आज निवेदन दिले. यावेळी अभिजीत भोसले, सुहास उमराणीकर, किरण वनकुदरे, राजेश कनानी, राजेंद्र भिवटे, यशराज जोशी राव, इस्माईल देवळे, विक्रम निसार, पियुष जाधव, पराग सुगंधी, शितल वडकुद्रे, भालचंद्र लाटकर, योगेश कुबेर, जाफर हुक्केरीकर, शशिकांत सामानगडकर, किरण चोपडे आदी उपस्थित होते.


अंबाबाई मंदिर विकास आराखड्यात बाधितांचे पुनर्वसन स्थानिक पातळीवरच करावे – संघटनेची मागणी
Total Views: 89