शैक्षणिक

आजरा तालुक्यातील 22 शाळांचा निकाल शंभर टक्के तर तालुक्याचा निकाल 98•28 टक्के         

The results of 22 schools in Ajra taluka are 100 percent while the results of the taluka are 98 percent


By nisha patil - 8/5/2026 3:39:03 PM
Share This News:



आजरा तालुक्यातील 22शाळांचा निकाल शंभर टक्के तर तालुक्याचा निकाल 98•28 टक्के           
 

आजरा(हसन तकीलदार) - आजरा तालुक्यातील शाळांनी दहावी परीक्षेत विशेष चमक दाखवली आहे. तालुक्यातील तब्ब्ल 22 शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे तर दहावीचा आजरा तालुक्याचा निकाल 98.28 टक्के लागला आहे.


दहावीच्या निकालाची विद्यर्थ्यांबरोबरच पालकांची लागलेली उत्कंठा आज अखेर संपली एसएससी महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेचा आजरा तालुक्याचा निकाल 98.28 टक्के इतका लागला. या परीक्षेसाठी तालुक्यातून 1 हजार 228 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तब्ब्ल 1 हजार 207 विद्यार्थी पास झाले आहेत. तालुक्यातील 22शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी पास झाल्याचे कळताच फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.


आजरा तालुक्यातील शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे : व्यंकटराव हायस्कूल आजरा 98.98%, उत्तुर विद्यालय 95.23%, आजरा हायस्कूल 97.83%, डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल आजरा 95.83%, बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे 96.42%, एरंडोल हायस्कूल 90.00%, पेरणोली हायस्कूल 95.23%, वाटंगी हायस्कूल 95.83%, छत्रपती शिवाजी विद्यालय होन्याळी 85.71%.

 

शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा पुढील प्रमाणे :  भादवण हायस्कूल, कर्मवीर विद्यालय चिमणे, मलीग्रे हायस्कूल, रोझरी इंग्लिश स्कूल आजरा, भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी, वसंतरावदादा पाटील विद्यालय उत्तुर, सरस्वती हायस्कूल हत्तीवडे, आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल महागोंड, आदर्श हायस्कूल शिरसंगी, राजाभाऊ केसरकर हायस्कूल निंगुडगे, चाफवडे हायस्कूल, माध्यमिक विद्यालय आरदाळ, मडीलगे हायस्कूल, चोरगे विद्यालय बेलेवाडी हुबळगी, पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा, दाभील हायस्कूल, केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी, आदर्श माध्यमिक विद्यालय सरंबळवाडी, रवळनाथ हायस्कूल देवर्डे, माध्यमिक विद्यालय कोळिंद्रे, पार्वती शंकर विद्यालय उत्तुर, डायनामिक पब्लिक स्कूल सुळेरान.


गल्ली बोळात एकच जल्लोष दिसत होता.. कोणी फटाके फोडून आणि पेढे वाटून आपला आनंद साजरा करीत होते.


आजरा तालुक्यातील 22शाळांचा निकाल शंभर टक्के तर तालुक्याचा निकाल 98•28 टक्के         
Total Views: 1