आरोग्य
निद्रानाशाचे मूळ कारण
By nisha patil - 2/9/2025 1:14:02 PM
Share This News:
निद्रानाशाचे मूळ कारण
आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वांत जास्त त्रास देणारी समस्या म्हणजे निद्रानाश. उपाय म्हणून झोपेच्या गोळ्या घेतल्या जातात; पण खरा प्रश्न असा आहे, की आपल्याला झोप का लागत नाही ? आपलं शरीर एका विशिष्ट घड्याळानुसार चालतं. सूर्यास्तानंतर अंधार पडताच शरीरात मेलॅटोनिन नावाचं संप्रेरक तयार होतं, जे झोप लागण्यास मदत करतं. सकाळी सूर्यप्रकाश मिळाल्यावर शरीरातून कॉर्टिसोल हॉर्मोन स्रवला जातो ज्याने ऊर्जा मिळते. ही प्रक्रिया विस्कळीत झाली, की निद्रानाश सुरू होतो.
फंक्शनल मेडिसिनचा दृष्टिकोन
ताणतणाव आणि कॉर्टिसोल दिवसभर ताण असल्यास कॉर्टिसोल हे संप्रेरक जास्त तयार होतं व ते संध्याकाळपर्यंत जास्त प्रमाणात शरीरात राहतं, त्यामुळे हे झोप आणणाऱ्या मेलॅटोनिनला दाबून टाकतं.
ब्लड शुगर रोलरकोस्टर : दिवसभर साखरेचे पदार्थ, रात्री उशिरा चहा-कॉफी घेतल्यास रक्तातील साखर सतत वर-खाली होते. रात्री अचानक साखर कमी झाली तर मेंदू जागा होतो.
पचनसंस्था आणि आंत्र (Gut) आरोग्य आपल्या आंत्रातूनही झोपेसाठी आवश्यक सेरोटोनिन तयार होतं. आंत्रात सूज (Gut Inflammation) किंवा असंतुलन असेल तर झोप बिघडते.
स्क्रीनटाइम आणि प्रकाश: मोबाईल लॅपटॉपचा निळसर प्रकाश हा मेलाटोनिन ब्लॉक करतो, त्यामुळे झोप लागण्यास व्यतय येतो.
जीवनशैलीतील अनियमितता : जेवणाचे, व्यायामाचे आणि झोपेचे वेळा ठरलेल्या नसल्या, तर शरीराचं नैसर्गिक घड्याळ गोंधळून जातं.
गोळ्या झोप नक्की आणतात; पण त्या शरीराच्या मूळ घड्याळाला सुधारणारा उपाय नाहीत. त्यामुळे गोळ्या थांबवल्या, की पुन्हा निद्रानाश सुरू होतो. शिवाय दीर्घकाळ गोळ्या घेतल्याने यकृत, मेंदू आणि हार्मोनल संतुलनावर वाईट परिणाम होतो.
फंक्शनल मेडिसिननुसार निद्रानाशावर उपाय म्हणजे मूळ कारण शोधणं :
Circadian rhythm नुसार अनुभव शरीराला द्या. झोपण्याच्या वेळा फिक्स ठेवा.
झोपण्याच्या आधी किमान १ तास मोबाईल-स्क्रीन बंद करा. साखर, कॅफिन,
अल्कोहोल यांचं प्रमाण कमी करा. रात्री झोपताना एक चमचा तूप घ्या.
तुपात ट्रिप्टोफॅन (Tryptophan) असल्याने झोप येण्यास मदत होते. ताण कमी करण्यासाठी श्वसनप्रक्रिया, ध्यान, योगा हे रोज करा. शरीराला योग्य मायक्रोन्युट्रिएंट्स, जसं की मॅग्नेशियम, बी-व्हिटॅमिन्स यांची पूर्तता करा.
निद्रानाश हा केवळ लक्षण आहे; त्यामागचं मूळ कारण शोधून जीवनशैलीत बदल केला, तर झोपेच्या गोळ्यांची गरज भासत नाही. फंक्शनल मेडिसिनचा संदेश स्पष्ट आहे : 'झोप ही औषध नाही, तर आरोग्याचं नैसर्गिक वरदान आहे, ते पुन्हा मिळवता येऊ शकतं.
निद्रानाशाचे मूळ कारण
|