विशेष बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार – राजेश क्षीरसागर

The saffron flag of the Mahayuti will be hoisted in the upcoming local self


By nisha patil - 7/11/2025 3:55:53 PM
Share This News:



आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार – आ. राजेश क्षीरसागर

शिवसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा व माजी नगरसेवकांचा आ. क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार

शिवसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा व माजी नगरसेवकांचा सत्कार शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असून, महायुती सरकारच्या जनहितैषी कामाच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भगवा फडकवणारच. शहराच्या विकासासाठी शिवसेनेतून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख रणजीत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार – राजेश क्षीरसागर
Total Views: 41