विशेष बातम्या

“पावसाने रुळवलेलं वेळापत्रक, शेतकऱ्यांची पंचाईत!”

The schedule was disrupted by the rain


By nisha patil - 7/21/2025 3:51:08 PM
Share This News:



“पावसाने रुळवलेलं वेळापत्रक, शेतकऱ्यांची पंचाईत!”

पूर्वी निसर्गाचं कालचक्र ठरलेलं होतं. पण गेल्या पाच वर्षांत या चक्रात मोठा बदल झाला आहे. यंदा मान्सूनच्या पहिल्या 50 दिवसांतच विक्रमी 622 मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस गेल्या पाच वर्षांतला सर्वाधिक असून जून-जुलैच्या सरासरीच्या तब्बल 77 टक्के पाऊस आधीच झाला आहे.

साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात धूळवाफ पेरण्या होऊन मान्सूनचा जोर सपाट होत असे. पण यंदा सलग पावसामुळे शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडलंय. अनेक ठिकाणी पेरण्या थांबवाव्या लागल्या, काही ठिकाणी भाताची रोपं लावण्यात आली. पण जमिनीत बापसा नसल्यानं पिकांची वाढ अडचणीत आली आहे. ऊस पिकाला तर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

त्यातच 25 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 2021 मध्ये आलेल्या महापुरानंतर प्रत्येक पावसाळ्यात कोल्हापूरकरांना धास्ती वाटतेय. यंदाही तेच चित्र दिसतंय.

तर पाऊस चांगला असला तरी सततच्याच पावसामुळे शेतीचं गणित पुरतं कोलमडलंय. आता पाऊस थांबतो का, की आणखी झोडपतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


“पावसाने रुळवलेलं वेळापत्रक, शेतकऱ्यांची पंचाईत!”
Total Views: 65