शैक्षणिक

मलिग्रे हायस्कूल पुनरुत्थानासाठी ग्रामस्थांचा निर्धार — दत्ता मराठे

The schools condition is serious


By nisha patil - 8/12/2025 11:36:06 AM
Share This News:



 आजरा -:आजरा तालुक्यातील मलिग्रे हायस्कूलच्या पुनरुत्थानासाठी ग्रामसभेत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. १९७२ साली स्थापन झालेल्या या नामवंत हायस्कूलची सध्या झालेली दुरावस्था लक्षात घेऊन मुंबई ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष दत्ता मराठे यांनी शाळेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्याचा निर्धार व्यक्त केला. महागाव संस्थेच्या दुर्लक्षामुळे शिक्षणाचा दर्जा घसरल्याचा आरोप करत त्यांनी संस्था चालकांना चार महिन्यांचा अवधी दिला.

मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक तर्डेकर यांनी शाळेसाठी मंडळ आणि माजी विद्यार्थ्याकडून देणगी स्वरूपात मदत करण्यात येईल असे सांगितले. ग्रामस्थांनी शाळेचा सर्व्हे करून पटसंख्या वाढवण्याचे आणि संस्था सहकार्य न केल्यास पर्यायी मार्ग शोधण्याचे मत व्यक्त केले. २०१६ पासून संस्था अध्यक्ष भेटत नसल्याने शाळा गावाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

शिक्षणाचा दर्जा उंचावणे हेच गावाच्या विकासाचे प्रमुख साधन असल्याचे सरपंच शारदा गुरव यांनी स्पष्ट केले.


मलिग्रे हायस्कूल पुनरुत्थानासाठी ग्रामस्थांचा निर्धार — दत्ता मराठे
Total Views: 41