बातम्या

१९ वर्षांची अंधश्रद्धेची बेडी अखेर तुटली! सव्वा किलोच्या जटेतून ६० वर्षीय माऊलीची मुक्तता!

The shackles of 19 years of superstition are finally broken


By nisha patil - 11/21/2026 2:45:38 PM
Share This News:



१९ वर्षांची अंधश्रद्धेची बेडी अखेर तुटली! सव्वा किलोच्या जटेतून ६० वर्षीय माऊलीची मुक्तता!

कोल्हापुरात अंधश्रद्धेला मोठा धक्का देणारी घटना समोर आली आहे. तब्बल १९ वर्षे डोक्यावर जटांचं ओझं आणि मनात देवाच्या कोपाची भीती घेऊन जगणाऱ्या ६० वर्षीय माऊलीची अखेर जटेतून मुक्तता करण्यात आली. पतीचा मृत्यू, दोन मुलांना गमावण्याचं दुःख आणि त्यात अंधश्रद्धेच्या भीतीने त्यांचं आयुष्य अधिकच वेदनामय झालं होतं. जवळपास सव्वा किलो वजनाच्या जटेमुळे मानदुखी, पाठदुखी आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता.
 

जट काढल्यास कुटुंबावर संकट येईल, या भीतीने त्यांनी अनेक वर्षे जटेला हात लावू दिला नाही. उलट पूजा-अर्चा आणि धार्मिक विधींवर तब्बल ५० ते ६० हजार रुपये खर्च केले. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी संवादातून भीती दूर करत त्यांना निर्भय केलं. अखेर १९ नोव्हेंबर रोजी ताराबाई पार्क येथे कोल्हापूर शहर शाखेच्या पुढाकारातून त्यांची जटमुक्ती करण्यात आली.
 

या मोहिमेत कार्याध्यक्ष राजेश वरक, गीता हसुरकर, किरण गवळी, बाळासाहेब माळी आणि सीमा पाटील यांनी सहभाग घेतला. प्रसारमाध्यमांमुळे या माऊलीपर्यंत मदतीचा संदेश पोहोचला आणि त्यांच्या मुलींनी पुढाकार घेतला. १९ वर्षांची भीती संपली, अंधश्रद्धेची बेडी तुटली आणि एका माऊलीला मिळाला वेदनामुक्त जगण्याचा नवा मार्ग!


१९ वर्षांची अंधश्रद्धेची बेडी अखेर तुटली! सव्वा किलोच्या जटेतून ६० वर्षीय माऊलीची मुक्तता!
Total Views: 16