शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये सहावा ‘विवेकानंद महोत्सव’ उत्साहात संपन्न
By Administrator - 2/18/2026 4:15:59 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये सहावा ‘विवेकानंद महोत्सव’ उत्साहात संपन्न
कोल्हापूर, दि. 18 : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर आयोजित सहावा ‘विवेकानंद महोत्सव : 2026’ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह त्यांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटनप्रसंगी Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha चे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासाच्या युगात विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहन केले. या महोत्सवाचे आयोजन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे व IQAC समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांनी प्रास्ताविकात महोत्सवाचा उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती व उद्योजकता विकसित व्हावी यासाठी हा उपक्रम असल्याचे सांगितले.
स्टुडंट्स एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद
महोत्सवात आयोजित ‘स्टुडंट्स एक्स्पो’मध्ये 32 आजी-माजी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यवसायांचे सादरीकरण केले. महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह भोसले व सप्रे इंडस्ट्रीजच्या संचालिका रेणुका अजय सप्रे यांनी भेट देत विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेचे कौतुक केले. तसेच ऑस्ट्रेलिया व आफ्रिका येथील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी आपल्या देशाची संस्कृती व हस्तकला सादर केली.
‘मिस्टर अँड मिस विवेकानंद’ स्पर्धा रंगली
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या ‘मिस्टर अँड मिस विवेकानंद’ स्पर्धेत श्रीशैल शिंदे याची ‘मिस्टर विवेकानंद’ तर कु. आर्या काटकर हिची ‘मिस विवेकानंद’ म्हणून निवड झाली. तसेच फूड फेअरमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद उपस्थितांनी घेतला.
विविध स्पर्धांचे निकाल जाहीर
अभिवाचन स्पर्धा :
प्रथम – ऋषी डोंगरे व सृष्टी पाटील (विवेकानंद कॉलेज)
द्वितीय – अक्षय नलावडे-जहागिरदार (Shivaji University)
तृतीय – शारदा श्रृंगारे व आर्या कुंभार (D. Y. Patil College, Kolhapur)
सोलो डान्स :
प्रथम – श्रीनंदन मालपाणी (विवेकानंद कॉलेज)
द्वितीय – शुभम कोळी (पी.डी.व्ही.पी. कॉलेज, तासगाव)
तृतीय – तेजश्री कुलकर्णी (डी. वाय. पाटील कॉलेज)
ग्रुप डान्स :
प्रथम – देवयानी ग्रुप (विवेकानंद कॉलेज)
द्वितीय – तनिष्का ग्रुप (विवेकानंद कॉलेज)
तृतीय – श्रीमती ए.आर.पी. कन्या कॉलेज, इचलकरंजी
आयडियाथॉन :
प्रथम – पंडीत मोहिते, अरुण कदम, पार्थ सावंत, रविना वाईंगडे (विवेकानंद कॉलेज)
द्वितीय – पौर्णिमा धनवडे (दि न्यू कॉलेज, कोल्हापूर)
तृतीय – सुश्रुत देशमुख (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर)
रिल फ्लिक्स :
प्रथम – अस्लम कलादर्गी (राजे रामराव महाविद्यालय, जत)
द्वितीय – अभिषेक बनसोडे (विवेकानंद कॉलेज)
तृतीय – मिथाली कांबळे (राजे रामराव महाविद्यालय, जत)
सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील व निहाल रुकडीकर यांनी केले. आभार डॉ. कविता तिवडे यांनी मानले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याने महोत्सव उत्साहात पार पडला.
विवेकानंद कॉलेजमध्ये सहावा ‘विवेकानंद महोत्सव’ उत्साहात संपन्न
|