बातम्या

आजऱ्यात यूज्डकार असोसिएशनचा सहावा वर्धापन दिन उत्साहात

The sixth anniversary of the Used Car Association


By Administrator - 3/24/2026 3:38:31 PM
Share This News:



आजऱ्यात यूज्डकार असोसिएशनचा सहावा वर्धापन दिन उत्साहात
 

आजरा(हसन तकीलदार)*:- कोल्हापूर जिल्हा यूज्ड कार असोसिएशनचा सहाव्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आजरा, गडहिंग्लज व चंदगड यांच्या संयुक्तरित्या मार्गदर्शनाखाली आजरा येथे अगदी उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व अण्णा भाऊ समूहाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी,विठ्ठल उत्तूरकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावडेकर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विकी गवळी, सुधाकर बापू सासणे, जमीर भाई व असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष इजाज भाई नागरकट्टी हे हजर होते. सदर कार्यक्रमांमध्ये असोसिएशनची पुढील दिशा व व्यवसायातील अडचण व प्रशासनाचे प्रश्न याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. 
     

यावेळी बोलताना अशोकअण्णा चराटी म्हणाले की तुम्ही जी संघटना तयार केली आहे ती योग्य आहे. सर्व सामान्य माणसाला परवडेल अशा पद्धतीने योग्य दरात चांगल्या गाड्या पुरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. तुम्हाला ज्या ठिकाणी माझी गरज भासेल तेथे माझी साथ तुम्हाला मिळेल.
     

संस्थापक अध्यक्ष इजाजभाई नागरकट्टी यांनी म्हटले की, परिवहन कार्यालयामध्ये वाहन ट्रान्सफर करताना येणाऱ्या अडचणी व विलंब प्रक्रिया याबाबत आम्ही संघटनेतर्फे योग्य उपाय शोधणार आहोत. प्रसंगी लढा देण्याचीही आमची तयारी आहे. त्याचपद्धतीने वाहन खरेदी विक्री पारदर्शक पद्धतीने कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.तसेच आजरा तालुका अध्यक्षपदी समीर तकीलदार, उपाध्यक्ष पदी विजय डोंगरे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष पदी शेखर पाटील तर उपाध्यक्ष पदी दूंडाप्पा मदकरी आणि चंदगड तालुका अध्यक्ष पदी मारुती दळवी तर उपाध्यक्ष पदी मोहसीन शेख यांची नियुक्ती करणात आली त्याचप्रमाणे त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमांमध्ये या व्यवसायातील  ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जेष्ठ व्यवसायिक म्हणून झुल्पीकार माणगावकर आजरा तर ज्येष्ठ मेस्त्री म्हणून हेमंत सुतार गडहिंग्लज यांचा विशेष सत्कार करणेत आला. तसेच असोसिएशनच्या मार्फत विविध प्रसंगांमध्ये असोसिएशनची कशाप्रकारे मदत झाली  याबाबत संबंधितानी मांडण्याचा प्रयत्न केला.यावेळी आजरा, चंदगड, गडहिंग्लज व कोल्हापूर येथील डीलर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आजऱ्यात यूज्डकार असोसिएशनचा सहावा वर्धापन दिन उत्साहात
Total Views: 198