बातम्या

आजऱ्यातील भूमिपुत्र आक्रमक भूमिकेत

The son of the land in the present is in an aggressive role


By nisha patil - 8/28/2025 11:04:58 PM
Share This News:



आजऱ्यातील भूमिपुत्र आक्रमक भूमिकेत

देवकांडगाव बस सेवा पुन्हा सुरु होणार; तहसीलदार समीर माने यांचा हस्तक्षेप

आजरा (प्रतिनिधी) (हसन तकीलदार)  : मागील तीन-चार महिन्यांपासून बंद असलेली देवकांडगाव एस.टी. बस सेवा अखेर पुन्हा सुरू होणार आहे. पेरणोली–गारगोटी रस्त्याच्या कामामुळे बंद झालेल्या या सेवेबाबत प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल लक्षात घेऊन भूमिपुत्र युवा फाउंडेशन आजरा व ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती.

या निवेदनाची दखल घेत आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून एसटी प्रशासन व संबंधित बांधकाम कंपनीला चर्चा टेबलावर बसवले. यावेळी भूमिपुत्र फाउंडेशनचे रणजीत सरदेसाई यांनी प्रशासन व कंपनीला जाब विचारत प्रवाशांच्या समस्या मांडल्या.

शेवटी तहसीलदार माने यांच्या मध्यस्थीने २९ ऑगस्टपासून कोणत्याही परिस्थितीत बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. बससेवा सुरु करताना रस्त्यावरील अडचणी दूर करण्यासाठी बांधकाम कंपनीनेही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

ग्रामस्थांनी तहसीलदारांची कार्यतत्परता आणि भूमिपुत्र फाउंडेशनच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करत समाधान व्यक्त केले.


आजऱ्यातील भूमिपुत्र आक्रमक भूमिकेत
Total Views: 260