विशेष बातम्या
आईच्या अंत्यदर्शनाला निघालेला मुलगाच गेला… समडोळी-दुधगाव शोकसागरात बुडाले!
By nisha patil - 1/11/2025 4:54:53 PM
Share This News:
आईच्या अंत्यदर्शनाला निघालेला मुलगाच गेला… समडोळी-दुधगाव शोकसागरात बुडाले!
मिरज तालुक्यातील समडोळी येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. आईच्या मृत्यूने व्यथित झालेला मुलगा तिच्या अंत्यदर्शनासाठी निघाला आणि प्रवासातच अपघातात मृत्यूमुखी पडला. मृणालिनी किरण कुदळे (५५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
त्यांचा मुलगा सौरभ कुदळे (२७), अभियंता म्हणून बेंगळुरूमध्ये कार्यरत, आईच्या अंत्यदर्शनासाठी येत असताना हुबळी-धारवाड मार्गावर दुचाकी अपघातात ठार झाला. या दुर्दैवी घटनांनी समडोळी आणि मूळचे गाव दुधगाव दोन्ही ठिकाणे शोकसागरात बुडाली आहेत. शनिवारी आईवर व शुक्रवारी सायंकाळी मुलावर अंत्यसंस्कार पार पडले. मायलेकांच्या जाण्याने कुदळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आईच्या अंत्यदर्शनाला निघालेला मुलगाच गेला… समडोळी-दुधगाव शोकसागरात बुडाले!
|