बातम्या
शिवाजी विद्यापीठातील नियोजित क्रीडा महोत्सव दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करून तो निधी कोल्हापूर चे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी वापरावा..
By Administrator - 5/11/2026 10:35:23 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठातील नियोजित क्रीडा महोत्सव दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करून तो निधी कोल्हापूर चे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी वापरावा..
कोल्हापूर युवासेना - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष....
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे स्पोर्ट्स विभागाने क्रीडा महोत्सव अश्वमेध 2026 चे आयोजन केले आहे, क्रीडा महोत्सव अश्वमेध ही योजना बंद करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 7 ऑक्टोंबर 2026 रोजी शासन निर्णय काढला आहे,ज्यात सरळ -सरळ म्हणले आहे की, अश्वमेध क्रीडा महोत्सव ही योजना बंद करण्यात आलेली आहे.
व त्यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य देखील बंद आलेले आहे.असे असताना दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठात सध्या क्रीडा महोत्सव घेण्यासाठी लगबग सुरू आहे.क्रीडा महोत्सव हा कार्यक्रम साधारण जानेवारी 2027किंवा फेब्रुवारी 2027 मध्ये होणार असून या अश्वमेध क्रीडा महोत्सव कार्यक्रमासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून एकूण चार ते पाच हजार विद्यार्थी सहभागी होणार असून,कार्यक्रमासाठी सुमारे दहा कोटी इतका 10 कोटी खर्च होणार आहे. यासाठी आपणास एवढेच आम्ही सांगू इच्छितो की सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना ऐन जानेवारी - फेब्रुवारीमध्ये पाणीटंचाई सारखी भीषण परिस्थिती उद्भभवणार असताना हा कार्यक्रम घेण्यामागे नेमका आपला काय हेतू आहे? याच्यामध्ये कुणाचा टक्केवारी मिळवण्याच्या तर प्रयत्न नाही ना? असा सवाल आज पदाधिकारी यांनी कुलगुरू यांना केला..
म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात दुष्काळग्रस्त परिस्थितीत पैशाची उधळपट्टी न करता आपण हा कार्यक्रम रद्द करून, त्यातला थोडा निधी कोल्हापूर संस्थानाचे राजे श्री छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक बांधण्यासाठी करावा,जेणेकरून त्या स्मारकाची हजारो विध्यार्थ्यांना प्रेरणा येईल,अशी मागणी आज युवासेनेच्या पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली, यावर कुलगुरू यांनी देखील सकारात्मक भूमिका घेत यांचा नक्की विचार करू असे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा प्रमुख /शिवसेना शहर प्रमुख मंजित माने,शहर समन्व्यक अक्षय घाटगे, शुभम पाटिल, चिटणीस अभिषेक दाभाडे, तालुका प्रमुख योगेश लोहार,उपशहर प्रमुख कनिष्क शिंदे, अक्षय मोरे, डॉ. चिन्मय बोकील, आदित्य हुलजी, विद्यापीठ शाखेचे प्रमुख राजवर्धन झाबरे आदि उपस्थित होते..
शिवाजी विद्यापीठातील नियोजित क्रीडा महोत्सव दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करून तो निधी कोल्हापूर चे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी वापरावा..
|