बातम्या

‘लेडी सुपरकॉप’ मीरा बोरवणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष

The state has a big responsibility on experienced IPS officers


By nisha patil - 4/5/2026 5:41:09 PM
Share This News:




‘लेडी सुपरकॉप’ मीरा बोरवणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष

 

अनुभवी आयपीएस अधिकाऱ्यांवर राज्याची मोठी जबाबदारी - महिलांच्या हक्कांसाठी ठोस कामाची अपेक्षा


‘लेडी सुपरकॉप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १९८१ बॅचच्या बोरवणकर या महाराष्ट्र केडरमधील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी असून, त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाजलेली प्रकरणे यशस्वीपणे हाताळली आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग आता महिलांच्या हक्क, संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी होणार असून, त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.


‘लेडी सुपरकॉप’ मीरा बोरवणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष
Total Views: 11