बातम्या

राज्यस्तरीय चित्रकला शिल्पकला पन्हाळगडावर उत्साहात पार पडली, जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित.

The state level painting and sculpture competition


By nisha patil - 9/29/2025 3:41:58 PM
Share This News:



राज्यस्तरीय चित्रकला शिल्पकला पन्हाळगडावर उत्साहात पार पडली, जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित.

पन्हाळा प्रतिनिधी , शहाबाज मुजावर किल्ले पन्हाळागडचा UNESCO  यादीत समावेश झालेचे अनुषंगाने,स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियान व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित दसरा महोत्सव अंतर्गत  पन्हाळगडावर,भव्य चित्रकला व शिल्पकला स्पर्धा 2025 काल शनिवारी  दिनांक.  27 सप्टेंबर 2025, पन्हाळा नगरपरिषद ने अनेक मान्यवरांना यासाठी आमंत्रित केले होते.
         

शनिवारी गडावर खासदार, धैर्यशील माने, आमदार  अमोल महाडिक. खासदार, शाहू महाराज यांनी भेट दिली. रविवारी 29 9 2025 रोजी, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी भेट दिली, सर्वच मान्यवरांनी कलाकारांचे कौतुक केले व प्रोत्साहित केले पुन्हा पुन्हा अशा स्पर्धा गडावर व्हाव्या अशा अपेक्षा व्यक्त मान्यवरांनी केल्या.
             

नाशिक,नागपूर,जळगाव, पुणे, मुंबई,सांगली,सातारा संपूर्ण महाराष्ट्रातून, तसेच मध्य प्रदेश कर्नाटक , इतर राज्यातून ही काही स्पर्धक आलेले होते. जे स्पर्धक ऑनलाइन नोंदणी केले होते. त्याची राहण्याची जेवणाची सोय नगरपरिषदेने केली होती.
             

सदर स्पर्धेकरिता खुला गटामध्ये स्पर्धक - 152, विध्यार्थी गट स्पर्धक - 120 व शिल्पकला स्पर्धक - 45 अशी एकूण 317 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेचे आयोजन चेतनकुमार माळी, प्रशासक तथा मुख्याधिकारी, पन्हाळा नगरपरिषद यांनी केले.सदर स्पर्धेचे प्रायोजक वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूह व आर्या ग्रुप ऑफ कंपनी हे होते. येत्या 01ऑक्टोंबर2035 रोजी  त्याचा निकाल जाहीर करण्यात येईल.
         

तसेच सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी, आजी ,माझी नगरसेवक, गडावरचे स्थानिक नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिली,


राज्यस्तरीय चित्रकला शिल्पकला पन्हाळगडावर उत्साहात पार पडली, जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित.
Total Views: 89