बातम्या
विवेकानंदाच्या सार्जंट श्रीहरी शिपुगडे आणि जेयुओ वैष्णवी ढेंगे यांचे यश
By nisha patil - 9/15/2025 2:48:56 PM
Share This News:
विवेकानंदाच्या सार्जंट श्रीहरी शिपुगडे आणि जेयुओ वैष्णवी ढेंगे यांचे यश
कोल्हापूर दि. 15 : राष्ट्रीय छात्र सेनेमधून छात्रांच्या अंगभूत गुणांना वाव मिळण्यासाठी आणि सक्षम नेतृत्व समाजाला व देशाला मिळवून देण्यासाठी निरनिराळ्या शिबिरांचे आयोजन राष्ट्रीय स्तरावर केले जाते . राष्ट्रीय थल सेना कॅम्प च्या माध्यमातून छात्रांच्या शारीरिक आणि मानसिक सक्षमतेची कसोटी आणि चाळण युनिट , बटालियन ,ग्रुप , डायरेक्टरेट आणि राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते .
सदरचे सर्व शिबिर कोल्हापूर अमरावती आणि दिल्ली येथे संपन्न होतात. विवेकानंद कॉलेज कोल्हापूर मधील सार्जंट श्रीहरी शिपूगडे, जे यु ओ वैष्णवी ढेंगे यांनी अनुक्रमे ऑबस्टॅकल आणि टेन्ट पिचिंग या प्रकारामधून दिल्लीच्या शिबिरापर्यंत यशस्वी वाटचाल केली. राष्ट्रीय छात्र सेनेच्या देशभरातील 13 लाख मुलांमधून 250 छात्रांची निवड केली जाते. यामध्ये सदरच्या छात्रानी बाजी मारत महाविद्यालयाच्या यशस्वीतेची पताका फडकवत ठेवली आहे.
सदरच्या निवडीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर.कुंभार, एनसीसी विभाग प्रमुख मेजर सुनिता भोसले, लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सचिवा प्राचार्या सौ शुभांगी गावडे, संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, कर्नल मानस दीक्षित, कर्नल विक्रम नलावडे, लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई पाच आणि सहा महाराष्ट्र बटालियन एनसीसी स्टाफ आणि पालक यांचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंदाच्या सार्जंट श्रीहरी शिपुगडे आणि जेयुओ वैष्णवी ढेंगे यांचे यश
|