बातम्या
सर्किट बेंच वकील आणि पक्षकारांच्या एकजुटीचे यश.. ऋतुराज क्षीरसागर..
By nisha patil - 4/8/2025 11:21:18 PM
Share This News:
सर्किट बेंच वकील आणि पक्षकारांच्या एकजुटीचे यश.. ऋतुराज क्षीरसागर..
युवा सेनेच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात गुलाब पुष्प आणि साखर पेढे वाटून करण्यात आले अभिनंदन..
एक ऑगस्ट रोजी कोल्हापुरात दिनांक 18 ऑगस्ट पासून मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू करत असल्याबद्दलचे नोटिफिकेशन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी जारी केले आणि गेल्या अनेक वर्षापासूनचा लढा यशस्वी झाला, वकील आणि पक्षकार यांच्या एकजूटीचा हा विजय असून आज या सर्व वकील आणि पक्षकारांचे अभिनंदन करण्यासाठी आल्याचे युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी सांगितले..
जिल्हा व सत्र न्यायालय कसबा बावडा येथे आज कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू होत असल्याबद्दल युवा सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेबांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.टी.पाटील तसेच सर्व संचालक मंडळ आणि जेष्ठ वकील, तसेच पक्षकार यांचे साखर पेढे आणि गुलाबाचे पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बोलताना अध्यक्ष व्ही.टी. पाटील यांनी कोल्हापूर सर्किट बेंच बाबत वकील आणि पक्षकार बांधव यांनी सुरू केलेल्या गेल्या अनेक वर्षाच्या लढ्याला विधिमंडळात आणि रस्त्यावरच्या लढाईत कायमच पाठबळ देण्याचं काम आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांनी केले असून त्यांचेदेखील योगदान महत्वाचे असल्याचे सांगून साहेबांचे आभार मानले.
यावेळी कोर्टात उपस्थित सर्व ज्येष्ठ वकील, विधीज्ञ यांच्या सोबत ऋतुराज क्षीरसागर यांनी स्वतः संवाद साधत त्यांचे साखर पेढे भरवून अभिनंदन केले..
सर्किट बेंच वकील आणि पक्षकारांच्या एकजुटीचे यश.. ऋतुराज क्षीरसागर..
|