राजकीय

बहुजन मुक्ती पार्टीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन ऑक्टोबर महिन्यात मुंबई येथे होणार

The third national convention of Bahujan Mukti Party


By nisha patil - 9/27/2025 12:03:24 PM
Share This News:



आजरा(हसन तकीलदार):- बहुजन मुक्ती पार्टीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन 4 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत लोकमान्य टिळक क्रिडांगण, टिळक नगर, चेंबूर, मुंबई येथे होणार आहे आणि यासाठी आजरा तालुक्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते व पदाधिकारी मुंबईला जाणार असलेची माहिती बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने देण्यात आली आहे.
    बहुजन मुक्ती पार्टीचे तिसरे अधिवेशन मुंबईत होणार असून हे अधिवेशन ऐतिहासिक करण्यासाठी आजरा तालुक्याबरोबरच चंदगड, गडहिंग्लज येथूनही शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार आहेत यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. रोज दोन तीन गावात जाऊन लोकांना विचारधारा सांगून लोकांना येण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. मतांचा अधिकार ई. व्ही. एम. च्या माध्यमातून हिरावून घेतला जात आहे, ई. व्ही. एम. च्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. त्यासाठी ई.व्ही. एम. मशीन बंद झाली पाहिजे. ओ.बी.सी.जातीनिहाय जन गणना झाली पाहिजे. हिंदू, मुस्लिम, सवर्ण, दलित भांडणे लावण्याचे  जे षडयंत्र करीत आहेत या विषयावर चर्चासत्र होणार आहे. यासाठी सर्व बहुजन बांधव, शेतकरी वर्ग, मजूर, बेरोजगार तरुण, युवक येथे उपस्थित राहणार आहे असे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे उदघाट्न बाबुराव माने (पूर्व विधायक, शिवसेना उद्धव ठाकरे महाराष्ट्र प्रमुख ), तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वामन मेश्राम (बामसेफ भारत मुक्ती मोर्चा, नवी दिल्ली )हे असणार आहेत. आणि रवींद्र प्रतापसिंह (राष्ट्रीय प्रभारी बी.एम. पी. नवी दिल्ली ), दासाराम नाईक (राष्ट्रीय अध्यक्ष बी. पी. एम.), अनिलकुमार माने (राष्ट्रीय अध्यक्ष युवा प्रोपोस्ट), विकास चौधरी पटेल (राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजन पिछडा वर्ग), दादासाहेब पाटील (प्रदेश महाराष्ट्र अध्यक्ष),दीपक शिंदे (प्रदेश अध्यक्ष, युवा बी.एम. पी.)यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अधिवेशन संपन्न होणार आहे अशी माहिती ऍड. विद्या त्रिरत्ने (बहुजन मुक्ती पार्टी राष्ट्रीय सचिव, नवी दिल्ली)यांनी दिली.
   यावेळी डॉ. सुदाम हरेर, राहुल मोरे, किरण के के, दशरथ सोनुले, वोल्टर नाग, जुल्फीकार शेख, इर्शाद भडगावकर, शरद पाटील, सलीम महागोंडे, अमित सुळेकर, नितीन राऊत, हरीश शाक्य, सूर्यकांत कांबळे, जोतिबा सुतार, सयाजी यादव, विनायक खांडेकर, शेखर देशमुख, रवी देसाई, नितीन सुतार,. संदीप दाभीलकर, किरण क्रांतिसेन आदिजण उपस्थित होते


बहुजन मुक्ती पार्टीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन ऑक्टोबर महिन्यात मुंबई येथे होणार
Total Views: 104