ताज्या बातम्या
आजऱ्यात "दि बर्निंग कारचा थरार
By nisha patil - 2/16/2026 11:21:26 AM
Share This News:
आजऱ्यात "दि बर्निंग कारचा थरार"
आजरा (हसन तकीलदार):- आजरा आंबोली महामार्गावर न्यायालय इमारतीच्या मागे शरद सुतार यांचे चारचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. सायंकाळी चार चाकी गाडी दुरुस्तीचे काम करताना गाडीमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागून पेट्रोल गाडीने पेट घेतला.गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या आणखीन गाड्या होत्या परंतु प्रसंगावधान साधत सोहेल नेसरीकर यांनी तेथेच उभी असलेल्या टोविंग व्हॅनने गाडी मैदानात आणली आणि सामाजिक कार्यकर्ते राजा आगा यांना फोन केला. गाडी मैदानात आणल्याने गॅरेजचे होणारे संभाव्य नुकसान टळले.
राजा आगा यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन दलास फोन केला. परंतु फोन उचलला नाही. सतत फोन केल्यानंतर फोन उचलला. त्यावेळी फक्त ड्रायव्हर होता कर्मचारी नव्हते. राजा आगा हे स्वतः अग्निशमन दलाच्या गाडीपर्यंत जाऊन गाडीतूनच आग लागलेल्या ठिकाणी आले. आगा हे स्वतः अग्निशमन गाडीवर चढून पाण्याचा गन सुरु केला आणि आग विझवण्याच्या प्रयत्न केला.
यावेळी भाई भाई थिअटर समोरील गाळ्यांना लागलेल्या आगीच्या दुर्घटनेची आठवण ताजी झाली.पुन्हा एकदा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाची पोल खोल झाली आहे. नगरपंचायतीने प्रशिक्षित कर्मचारी अग्निशमन दलाच्या गाडीवर तैनात करणे गरजेचे आहे अशी चर्चा या ठिकाणी सुरु होती. राजा आगा यांच्या तत्परतेमुळे होणारे नुकसान टळले. त्यानंतर गाडी मालक सागर कोरी आणि मेस्त्री शरद सुतार यांना किरकोळ भाजले होते त्यासाठी आगा यांनी स्वतः दवाखान्यापर्यंत नेले. राजा आगा यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी सोहेल नेसरीकर, शाबाज खेडेकर, गाडी मालक सागर कोरी आणि गॅरेज मालक शरद सुतार उपस्थित होते.
आजऱ्यात "दि बर्निंग कारचा थरार
|