ताज्या बातम्या
आजरा तालुक्याच्या हाजगोळी तिट्याजवळ दि बर्निंग कारचा थरार
By nisha patil - 1/26/2026 1:19:03 PM
Share This News:
आजरा तालुक्याच्या हाजगोळी तिट्याजवळ दि बर्निंग कारचा थरार
आजरा(हसन तकीलदार):- गडहिंग्लज मार्गावर हजगोळी तिट्याजवळ चालत्या महिंद्रा एस.यु.व्ही.चारचाकीने अचानक पेट घेतल्याने चार चाकी अगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने चालकासह गाडीतील इतर प्रवाशांना प्रसंगावधान साधत बाहेर काढल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. परंतु वाहन पूर्णपणे जळून खाक झाले.
सोहळे येथून गडहिंग्लजच्या दिशेने सदर चारचाकी वाहन चालली असताना गाडीच्या पुढील बाजूस अचानक धूर येऊ लागल्याने गाडी थांबवण्यात आली. परंतु काही क्षणातच गाडीने पेट घेतला. या दरम्यान आजऱ्याचे मंजूर मुजावर आणि मुफ्ती खालिद खलिफ हे गडहिंग्लज येथून आजऱ्याच्या दिशेने येत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधान साधत त्यांनी गाडीतील प्रवाशांना पाठीमागील बाजूने बाहेर काढले आणि आजरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत वाहन जळून खाक झाले होते. शॉर्ट्सर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आजरा तालुक्याच्या हाजगोळी तिट्याजवळ दि बर्निंग कारचा थरार
|