बातम्या

गोकुळच्या सभेचा मुहूर्त ठरला! २१ डिसेंबरला राजकीय रणधुमाळी?

The time has been set for Gokul


By nisha patil - 11/28/2026 2:12:48 PM
Share This News:



गोकुळच्या सभेचा मुहूर्त ठरला! २१ डिसेंबरला राजकीय रणधुमाळी?

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या २१ डिसेंबर रोजी गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. या सभेकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, नव्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत होणारी ही पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा असणार आहे. त्यामुळे या सभेला राजकीय आणि सहकार क्षेत्राच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

गोकुळच्या कारभारावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली राजकीय चर्चा, दूध उत्पादकांचे प्रश्न, दूध दरवाढ, दूध संकलन, संघाचा आर्थिक कारभार आणि आगामी धोरणे यावर सभेत काय चर्चा होणार, याची उत्सुकता आहे.

सत्ताधारी संचालक मंडळ सभेत कोणती भूमिका मांडणार? विरोधी संचालक कोणते प्रश्न उपस्थित करणार? दूध उत्पादकांच्या अपेक्षांना कितपत न्याय मिळणार? आणि सभेत काही महत्त्वाचे निर्णय होणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे २१ डिसेंबरच्या सभेत मिळणार आहेत. त्यामुळे यंदाची गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा चांगलीच चर्चेत राहण्याची शक्यता आहे.


गोकुळच्या सभेचा मुहूर्त ठरला! २१ डिसेंबरला राजकीय रणधुमाळी?
Total Views: 16