राजकीय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला...
By nisha patil - 11/6/2025 2:54:05 PM
Share This News:
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला...
कोल्हापूर महापालिकेत आता १०० नगरसेवक तर २५ प्रभागांची नवी रचना...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जवळ आल्या असून नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के. यश गोविंदराव यांनी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश मंगळवारी जाहीर केले. यामध्ये कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील 19 ‘द’ वर्ग महापालिकांचा समावेश आहे.
प्रभाग रचना चार सदस्यांची असणार असून कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 81 वरून 100 केली जाणार आहे. त्यानुसार 25 प्रभागांची रचना केली जाणार आहे. प्रत्येक प्रभाग लोकसंख्या आणि मतदारसंख्या लक्षात घेऊन ठरवले जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले असून सुमारे अडीच महिन्याचा कालावधी लागणार आहे. यासाठी गुगल मॅपचा वापर करून अचूक विभागणी केली जाणार आहे.
कोरोनामुळे व ओबीसी आरक्षणावरील न्यायालयीन प्रक्रिया रखडल्यामुळे तीन वर्षे रखडलेल्या या निवडणुकांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे गती मिळाली आहे. राज्य सरकारने ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला...
|