बातम्या

सामानगडावर फलक फाडण्याचा प्रकार; संतापाची लाट, चौकशीची मागणी

The type of plaque being torn at Samanggad


By nisha patil - 4/30/2026 12:38:36 PM
Share This News:



सामानगडावर फलक फाडण्याचा प्रकार; संतापाची लाट, चौकशीची मागणी

गडहिंग्लज परिसरातील ऐतिहासिक वैभव असलेल्या सामानगडावर अज्ञातांकडून माहितीफलक फाडल्याचा निषेधार्ह प्रकार समोर आला आहे. गडावरील सात कमानीची विहीर आणि इतर ऐतिहासिक स्थळांची माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी लावलेले फलक तोडण्यात आल्याने इतिहासप्रेमी आणि पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेला वृत्तपत्रांतूनही प्रसिद्धी मिळाल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.


युवासेनेचे जिल्हाप्रमुख अवधूत पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देत संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गड परिसरात यापूर्वीही जंगलाला आग लावण्यासारखे प्रकार घडले असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पर्यटकस्थळाची विटंबना: सामानगड प्रकरणी कडक कारवाईची मागणी.


इतिहासाचा अवमान सहन होणार नाही; सामानगडावरील तोडफोडीविरोधात आवाज
Total Views: 15