बातम्या
*मलिग्रे शाही दसऱ्याचा, अभूतपूर्व पालखी सोहळा
By nisha patil - 10/20/2026 11:32:27 PM
Share This News:
*मलिग्रे शाही दसऱ्याचा, अभूतपूर्व पालखी सोहळा
*दोनशेहे वर्षांपासून जपली जाते परंपरा
*आजरा(हसन तकीलदार):- मंदिर साफसफाई करून, देव बसविण्याची व घटस्थापनेच्या मुहूर्तावर शेतीतील बि बियाणे मातीत मिसळून, घटाची स्थापना केली जाते. नऊ दिवस भाविक रात्रंदिवस फलाहार घेऊन मंदिरात राहून, उपवास करतात. या मंडळींना नवरात्र करी, असे म्हणतात. देव उठल्यानंतर पालखी चाळोबा डोंगराकडे प्रयाण करते हा शाही दसऱ्याचा अभूतपूर्व पालखी सोहळा पाहण्यासाठी मलिग्रे ता. आजरा येथे प्रचंड जनसमुदाय मोठ्या भक्तिभावाने सामिल होतो.
साधारण दोनशे वर्षांपूर्वी पासून या शाही दसऱ्याची परंपरा लाभली असून,मलिग्रेचे ग्रामदैवत रवळनाथ आणी चाळोबा हे प्रमुख रखवालदार आहेत. गावच्या मध्यभागी असलेल्या दगड मातीतील जून्या मंदिराचे बांधकाम काढून ,भव्य असे आरसीसी मध्ये मंदिर बांधले आहे. "दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा" या उक्तीप्रमाणे नऊ दिवस मंदिरांत बसलेल्या नवरात्र कऱ्याच्या मदतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. रोज सकाळ संध्याकाळी गावच्या मंदिरांना भेटी देण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात येते.
सध्या नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गामाता प्रतिष्ठापना करण्यात येत असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याठिकाणी आरती फिरविण्याच्या कार्यक्रमासाठी सर्व हकिमदार उपस्थित राहून गावभर मिरवणूक काढली जाते.भावेश्वरी मल्लिकार्जुन, लक्ष्मी या जागृत मंदिराच्या मध्ये गाऱ्हाणे घातली जातात.
दसऱ्याच्या दिवशी शाही थाटात पालखी शिमोलंघन करण्यासाठी गावच्या पश्चिमेला असलेल्या चाळोबा डोंगराकडे प्रयाण होते हा सोहळा पाहण्यासाठी अबाल,वृध्द व माहेर वासीनी, माता,भगिनी मोठ्या भक्तिभावाने सामिल होतात. येथील पालखी भाविकांच्या वरून नेण्याची परंपरा असल्याने भाविक आपल्यातील ईडापिडा नष्ट होवून सुखासमाधानाने राहण्यासाठी पालखी समोर लांबलचक रांग लागलेल्या असतात. गावच्या वेशीवरून पालखी डोंगराकडे अत्यंत चपळाईने पळवळी जाते. यासाठी तरूण मुले खांद्यावर पालखी हातात आबधागीरी घेऊन पळतात .
डोंगरात सिमोलंघन झाल्यानंतर पुजा करून सोने लुटण्यासाठी स्पर्धा लागते पालखीत पहिल्यांदा सोने टाकणाऱ्याना मानाचा फेटा बांधला जातो. पालखी माघारी येते आणि गावकरी एकमेकांना भेटून सोने वाटप करण्यात रममाण होतात.
*मलिग्रे शाही दसऱ्याचा, अभूतपूर्व पालखी सोहळा
|