बातम्या

गोकुळच्या सत्तेचा फैसला केंद्रनिहाय मतमोजणीतून! क्रॉस व्होटिंगचा अंदाज येणार समोर

The verdict on power in Gokul will


By nisha patil - 10/17/2026 4:21:16 PM
Share This News:



गोकुळच्या सत्तेचा फैसला केंद्रनिहाय मतमोजणीतून! क्रॉस व्होटिंगचा अंदाज येणार समोर

सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. संचालक पदाच्या २५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात असून, छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी आणि राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी यांच्यात थेट लढत रंगली आहे. उद्या, १८ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार असून, १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत केंद्रनिहाय मतमोजणी हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरील मतांची स्वतंत्र मोजणी केली जाणार असल्याने कोणत्या भागात कोणत्या आघाडीला मतदारांनी पसंती दिली, हे स्पष्ट होणार आहे.

विशेष म्हणजे, या आकडेवारीतून क्रॉस व्होटिंगचा अंदाजही समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ उमेदवारांच्या विजय-पराजयाकडेच नव्हे, तर प्रत्येक मतदान केंद्रावरील मतांच्या आकडेवारीकडेही राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडून मतदान आणि मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, आता उत्सुकता आहे ती गोकुळच्या सत्तेचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याची! केंद्रनिहाय मतांचा निकाल सत्तेची गणितं बदलणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.


गोकुळच्या सत्तेचा फैसला केंद्रनिहाय मतमोजणीतून! क्रॉस व्होटिंगचा अंदाज येणार समोर
Total Views: 9