ताज्या बातम्या
संविधान दिनानिमित्त कोल्हापूरात भव्य प्रबोधनात्मक कार्यक्रम; नामांकित कलाकारांची उपस्थिती
By nisha patil - 11/25/2025 11:58:47 AM
Share This News:
कोल्हापूर : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून कोल्हापूरमध्ये भव्य आणि प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील दिग्गज व लोकप्रिय कलाकार या कार्यक्रमात आपल्या उपस्थितीने रंगत आणणार आहेत.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक मा. डॉ. उत्कर्ष शिंदे, लोकप्रिय गायक मा. कबीर नाईकनवरे, तसेच प्रसिद्ध शाहीर रणजीत कांबळे हे आपल्या प्रभावी सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. संविधानातील मूल्यांची जपणूक आणि जनजागृती हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून विविध कलावंतांच्या प्रस्तुतींमुळे तो अधिक अर्थपूर्ण ठरणार आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता आयोजित करण्यात आला असून, तो प्लस हॉस्पिटल शेजारी, सीमा अपार्टमेंट समोर, कदमवाडी, कोल्हापूर येथे होणार आहे. नागरिकांनी या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला उपस्थित राहून संविधान दिनाचा संदेश व्यापक करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संविधान दिनानिमित्त कोल्हापूरात भव्य प्रबोधनात्मक कार्यक्रम; नामांकित कलाकारांची उपस्थिती
|