बातम्या
कोल्हापूर-सांगली: शेतकऱ्यांना ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा’ लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा
By nisha patil - 4/10/2025 5:30:24 PM
Share This News:
कोल्हापूर-सांगली: शेतकऱ्यांना ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा’ लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सुमारे १० हजार शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. यापूर्वी वीज बिलात चुकीचा किंवा वाढीव भार नोंद झाल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित होते.
राज्यातील कृषिपंप शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ राबविली आहे. या योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णपणे मोफत वीज पुरवली जाते. मात्र, वीज देयकावर चुकीचा भार असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नव्हता.
आता महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व वीज बिलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती केल्यावर शेतकऱ्यांना ही योजना लाभदायक ठरेल. ही योजना मार्च २०२९ पर्यंत राबविण्यात येणार आहे, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
कोल्हापूर-सांगली: शेतकऱ्यांना ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा’ लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा
|