बातम्या

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा वजनकाटा अचूक

The weighing scale of Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory is accurate


By nisha patil - 11/20/2025 5:42:02 PM
Share This News:



सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा वजनकाटा अचूक
        
वैधमापनशास्त्र विभागाची तपासणी

      
बेलेवाडी काळम्मा, दि. २०: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा वजनकाटा अचूक असल्याचे वैधमापन शास्त्र विभागाच्या तपासणीमध्ये सिद्ध झाले.  साखर कारखान्याच्या वजन काट्याची महाराष्ट्र सरकारच्या वैधमापन विभागाच्या भरारी पथकाने कारखान्यावर भेट देऊन अचानक तपासणी केली. या तपासणीमध्ये हा वजन काटा अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे. सह नियंत्रक पुणे विभागद्वारे नियुक्त वैधमापन विभागाने सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे वजन काट्याची अचानक तपासणी केली असता तपासामध्ये तीन ठिकाणी वजने करण्यात आली. यामध्ये कारखान्याचे सर्व वजनकाटे बिनचूक व चोख असल्याचे स्पष्ट झाले.

        
पथकामध्ये सातारा जिल्ह्याच्या सहाय्यक नियंत्रक सौ. ज्योती पाटील, सहाय्यक निरीक्षक श्री योगेश अग्रवाल हे उपस्थित होते. या भेटी व तपासणीवेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री. संजय शामराव घाटगे, इन्स्टूमेंट मॅनेजर श्री.भूषण हिरेमठ, शेती अधिकारी श्री गोकुळ मगदुम व केनयार्ड सुपरवायझर श्री अमर माने उपस्थित होते.
          
कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ  यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वैधमापन विभागाच्या भरारी पथकाने सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे तिन्ही वजनकाटे अचानक तपासले. यावेळी वजन काटा १००% बिनचूक व चोख असल्याचे स्पष्ट झाले. कारखान्याचे संस्थापक नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यात शेतक-याच्या हिताचा व पारदर्शक कारभार केला जात आहे. घोरपडे कारखान्याचा वजनकाटा हा बिनचूक व चोख असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा वजनकाटा अचूक
Total Views: 29