बातम्या
*वजन-मापे विभागाच्या भरारी पथकाच्या तपासणीत आजरा साखर कारखान्याचे वजन काटे अचुक *"
By Administrator - 12/1/2026 6:46:47 PM
Share This News:
*वजन-मापे विभागाच्या भरारी पथकाच्या तपासणीत आजरा साखर कारखान्याचे वजन काटे अचुक *"
आजरा (हसन तकीलदार )*:-शुकवार दि.09.01.2026रोजी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचे आदेशाने निरीक्षक वैद्यमापन शास्त्र व इतर अधिकारी यांचे भरारी पथकाने वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याचे दोन्ही ऊस वजन काटयाची तपासणी करण्यासाठी सकाळी अचानक भेट दिली व दोन्ही वजन काटयांची संपर्ण पडताळणी केली. त्यांनी तपासणी कामी ट्रक व ट्रॅक्टर अशा पुर्वी वजन केलेल्या व नविन वाहनांची वजने घेतली. तसेच 8टनाची वजने प्रत्यक्षात ठेवून पडताळणी केली त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही.
त्यामुळे वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे ऊस, साखर व उपपदार्थ वजन करणारे सर्व काटे बिनचूक व निर्दोष असलेचे स्पष्ट झाले." कांटे बिनचूक असलेचा अहवाल भरारी पथक अधिकारी यांनी कारखान्यास सादर केला. .वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना हा गडहिंग्लज उप विभागातील सहकारी साखर कारखाना असून, या कारखान्याच्या वजन काटयाबाबत ऊस पुरवठादार शेतक-यांमध्ये नेहंमींच विश्वासार्हता आहे. सदर तपासणीमुळे ती विश्वासार्हता पुन्हा वृध्दींगत झाली आहे.त्यामुळे ऊस उत्पादक सभासदांचा कारखान्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
भरारी पथकाचे अधिकारी एम.व्ही.देसाई(निवासी नायब तहसिलदार, आजरा), श्री.अनिल ईश्वर सरंबळे(पोलिस निरिक्षक प्रतिनिधी, आजरा),अविनाश अरूण शिंगाडी( निरीक्षक वैद्यमापन शास्त्र गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज), शिवदास भिवसन सोनवणे( लेखापरिक्षक श्रेणी-1.सह.संस्था (साखर)कोल्हापूर), मारूती रामु कसरकर व आनंदा कृष्णा जाधव( शेतकरी प्रतिनिधी), तुकाराम मारूती मोळे,(केनयार्ड सुपरवायझर) यांचे समक्ष काटयांची तपासणी केली.
त्यावेळी कार्यकारी संचालक एस.के.सावंत, जंनरल मॅनेजर (टेक्न.), चिफ केमिस्ट, ऊस पुरवठादार शेतकरी, केनयार्डचे कर्मचारी, सर्व वाहन मालक व चालक प्रत्यक्ष उपस्थित होते.
*वजन-मापे विभागाच्या भरारी पथकाच्या तपासणीत आजरा साखर कारखान्याचे वजन काटे अचुक *"
|