शैक्षणिक

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे कार्य व विचार शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शक मा. संयम हुक्केरी

The work and thoughts of the great scholar


By nisha patil - 7/8/2025 5:43:41 PM
Share This News:



शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे कार्य व विचार शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शक मा. संयम  हुक्केरी

कोल्हापूर दि.07 : विवेकानंद कॉलेजच्या ज्युनिअर सायन्स्‍ विभागाच्या सांस्कृतिक विभागामार्फत "डॉ. बापूजी साळुंखे  चरित्र व कार्य" या विषयावर अतिशय मौलिक व्याख्यान आयोजित केले होते व्याख्यानासाठी व्याख्याते म्हणून  संयम हु़केरी यांनी बापूजींच्या कार्यावर अमूल्य अशी माहिती विद्यार्थ्यांच्या समोर व्यक्त केली . याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे . अत्यंत प्रतिकुल परिस्थितीशी सामना करीत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली,  यामुळे अनेक गोरगरीब, बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची सोय झाली.

बापूजी साळुंखे एक कर्मयोगी व शिक्षणप्रेमी नेतृत्व्‍ होते.  त्यांचे विचार व कार्य महाराष्ट्राच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शक आहेत.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते.  या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी  शिक्षणमहर्षी  डॉ.बापूजी साळुंखे स्मृतिदिनानिमित्त ग्रंथालय हॉल मध्ये करण्यात आले होते.

सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सौ. गीतांजली साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. हिटणीकर एन.एन., प्रा सौ ए.पी. म्हात्रे,  प्रा.सारिका माने , प्रा. सपकाळ आर.एस, प्रा.कांचन पाटील, प्रा. एल एस नाकाडी या सर्वांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला.

सदर कार्यक्रमासाठी मा. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच ज्युनिअर सायन्स विभाग प्रमुख प्रा. नवले एम. आर.,स्टाफ सेक्रेटरी प्रा.शिंदे एस.टी. व सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. 


शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे कार्य व विचार शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शक मा. संयम हुक्केरी
Total Views: 180