बातम्या

मुस्लिम युवकांचे कार्य कौतुकास्पद -अशोकआण्णा चराटी

The work of Muslim youth is commendable


By nisha patil - 3/10/2025 11:51:56 AM
Share This News:



आजरा(हसन तकीलदार):-

आजरा येथील राहत खिदमत फाउंडेशनतर्फे स्वस्थ नारी- सशक्त परिवार अभियान दि. 17सप्टेंबर ते 02ऑक्टोबर सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने रक्तदान शिबीर, वृक्षारोपण मोहीम, आभा कार्ड बनवणे तसेच आयुष्यमान भारत कार्ड बनवणे अशा सामाजिक  उपक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ समूहाचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यासिन सैय्यद (सर)यांनी केले.

यावेळी सर्वप्रथम मौलाना लियाकत तगारे यांनी कुरान आयत पठण करून कार्यक्रमाची सुरवात केली. वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर व संत गजानन ब्लड स्टोरेज महागाव यांच्या संयुक्त विद्यमाने 02ऑक्टोबर 2025 रोजी गांधी जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी 58 रक्तदात्यांनी रक्तदान श्रेष्ठदान केले.

यांचबरोबर हजरत दावल मलिक परिसर व डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कुल प्रांगणात उदय इंदुलकर व डॉ. सुरजीत पांडव(ग्रामीण रुग्णालय, आजरा)यांचे हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. तसेच सुलगाव ता. आजरा येथील कु. सिद्धी अनिल देसाई हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत राज्य कर निरीक्षक वर्ग-2 (एस टी आय)पद संपादन केल्याबद्दल, आजऱ्यातील सेंट्रिंग कामगार आदमभाई इंचनाळकर यांनी आपल्या दोन्ही मुलींना बिकट परिस्थितीत उच्च व दर्जेदार शिक्षण देऊन, त्यांच्या मुलींची चांगल्या कंपनीत निवड झालेबद्दल आदम भाईंचा तसेच उत्कृष्ट व आदर्श वैद्यकीय सेवा देत असलेबद्दल डॉ. अमित बेळगुंदकर या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
    यावेळी अशोकआण्णा चराटी म्हणाले की, मुस्लिम समाजात आता भरपूर सकारात्मक बदल होत आहेत. आज मुस्लिम युवक युवती शिक्षणक्षेत्रात चांगली कामगिरी करीत आपला ठसा उमटवीत आहेत. मुलीं शिक्षणात चांगला ठसा उमटवित आहेत.आमच्या शैक्षणिक संस्थेत जवळ जवळ 25%मुस्लिम विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. आमच्या प्रत्येक संस्थांमध्येंही मुस्लिम  कर्मचारी म्हणून काम करीत आहेत.जेथे चांगले आहे तेथे आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करूया. ज्यावेळी एखादया चांगल्या कामाची जबाबदारी येते त्यावेळी आम्ही सर्व गट तट विसरून विकासासाठी एकत्र येतोय. माणूस म्हणून आलोय आणि माणुसकी बरोबर घेऊन जाऊ या.एकसंघ राहून एकतेचे आदर्श देत विकासाचे आणि विधायक कामे करूया.या मुस्लिम युवकांनी खरोखरच आदर्शवत काम केले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
    डॉ. यशवंत चव्हाण म्हणाले की, एस.जी.एम. हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त रुग्णांना सुविधा देण्याचे प्रयत्न करत आहोत. सामाजिक कार्यकर्ते नौशादभाई बुडडेखान हे नेहमीच गोरगरीब, गरजू रुग्णांना आमच्याकडे आणतात आणि या रुग्णांना आम्ही कायम सहकार्य करित शासकीय योजनांचा लाभ देत असतो. आम्ही चॅरिटेबल फंडातूनही ज्यांना योजनांचा लाभ मिळत नाही त्यांना चॅरिटेबल फंडातून लाभ मिळवून देत असतो.
     यावेळी अझहर बागवान (व्यावस्थापक एस.जी.एम.),नागेश यमगर (सहाय्य्क पोलीस निरीक्षक, आजरा ),अमजद मीरा (अध्यक्ष लकी फाऊंडेशन ग्रुप, गडहिंग्लज), आशपाककिल्लेदार(गडहिंग्लज),  नौशादभाई बुडडेखान (युवा काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष), अनिकेत चराटी (आजरा तालुकाध्यक्ष, भाजपा ), किरण कांबळे (माजी नगरसेवक )डॉ.अमीर मुजावर (दंत सहाय्य्क, ग्रामीण रुग्णालय आजरा), डॉ. युनूस सैय्यद, समीर चांद, सर (अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष भाजपा), ताहीर शेख (ग्रामीण रुग्णालय प्रयोशाळा तंत्रज्ञ), महेश पाटील (शिवसेना उबाठा), समीर चांद (शिवसेना उबाठा), आरिफ खेडेकर, अनिल देसाई,कॉ. संग्राम सावंत, अमानुल्ला आगलावे, न्यामत मुजावर, सलीम शेख (प्र. मुख्याध्यापक उर्दू हायस्कुल आजरा),आदिसह राहत खिदमत फाउंडेशनचे पदाधिकारी, वैभव लक्ष्मी ब्लड बँके, कोल्हापूर व संत गजानन ब्लड स्टोरेज महागावचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार राहतचे अध्यक्ष मौजुद माणगावकर यांनी मानले.


मुस्लिम युवकांचे कार्य कौतुकास्पद -अशोकआण्णा चराटी
Total Views: 629