राजकीय

महानगरपालिकेच्या जेसीबी विभागाच्या कामात येणार गतिमानता; टायर पंक्चरची समस्या सुटणार

The work of the Municipal Corporations JCB department will be accelerated


By nisha patil - 5/5/2026 2:59:49 PM
Share This News:



महानगरपालिकेच्या जेसीबी विभागाच्या कामात येणार गतिमानता; टायर पंक्चरची समस्या सुटणार

 

आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांचा पुढाकार; १६ जादा स्टेपण्या खरेदीचे आदेश 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वर्कशॉप विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जेसीबीच्या टायर पंक्चरमुळे होणारा कामातील विलंब टाळण्यासाठी स्वतंत्र १६ व्हील असेंब्ली (स्टेपण्या) खरेदी करण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत.

 

यापूर्वी महानगरपालिकेचा जेसीबी शहरातील विविध भागात कार्यरत असताना टायर पंक्चर झाल्यासकार्यशाळा विभागातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाऊन अवजड चाक काढून ते वर्कशॉपमध्ये आणावे लागत असे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ते चाक संबंधित ठिकाणी नेऊन बसविण्यास बराच वेळ लागत होता. परिणामी विकासकामे तसेच आपत्कालीन स्वरूपाची कामे रखडत होती.

 

महानगरपालिकेकडे सध्या टाटा कंपनीचे ३ व जेसीबी कंपनीचे ५ असे एकूण ८ बॅकहोलॉडर्स कार्यरत आहेत. या यंत्रणांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी कार्यशाळा विभागास तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

 

या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या उपस्थितीत कार्यशाळा विभागाची बैठक पार पडली. बैठकीत पुढील ८ व मागील ८ अशा एकूण १६ व्हील रिमसह स्टेपण्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नव्या व्यवस्थेमुळे जेसीबीचे टायर पंक्चर झाल्यास घटनास्थळी तातडीने स्टेपणी बसवून वाहन पुन्हा कार्यान्वित करता येणार आहे. काढलेले चाक नंतर कार्यशाळेत दुरुस्त करून राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ व श्रम वाचणार असून शहरातील ड्रेनेजपाणीपुरवठारस्ते दुरुस्ती व इतर अत्यावश्यक कामे विनाविलंब पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

 

याबाबत आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांनी सांगितले कीमहानगरपालिकेच्या यंत्रणेत आधुनिकता व गतिमानता आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या छोट्या परंतु परिणामकारक निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल आणि नागरिकांची कामे अधिक वेगाने पूर्ण होतील.


महानगरपालिकेच्या जेसीबी विभागाच्या कामात येणार गतिमानता; टायर पंक्चरची समस्या सुटणार
Total Views: 3