बातम्या

अल्पवयीन चोरट्याकडून १६ लाखांची चोरी.

Theft of Rs 1 6 lakhs by a minor thief


By nisha patil - 6/6/2025 3:43:44 PM
Share This News:



अल्पवयीन चोरट्याकडून १६ लाखांची चोरी.

चोरीच्या पैशातून चैनी मॉलमध्ये खरेदी

शनिवार पेठेतील सोळा वर्षाच्या अल्पवयीन चोरट्याने शेजारच्या घरातील लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर आणि रोख रकमेवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आलीय. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये शनिवार पेठेतील रहिवासी शुभांगी सुजय म्हेत्रे यांनी याची तक्रार दाखल केली होती. पोलिस चार दिवसांपासून या चोरीचा छडा लावत होते. त्याचवेळी बाजूलाच राहणारा अल्पवयीन सोळा वर्षांचा मुलगा मॉलमध्ये जात ब्रँडेड आणि महागडे कपडे, आईस्क्रीम, पिझ्झासह चैनी करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं.पोलिसांनी त्याच्याकडे नजर फिरवली आणि चोरीचा छडा लागला.

नववीत शिकणाऱ्या या मुलाने तब्बल १५ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल  पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. या प्रकरणात आणखी कुणी सहभागी आहे का याचाही आता पोलिस शोध घेत आहेत.  २५ ते ३१ मे २०२५ या काळात चोरी झाली होती.


अल्पवयीन चोरट्याकडून १६ लाखांची चोरी.
Total Views: 145