बातम्या

फ्लिपकार्टच्या गोदामात लॅपटॉप चोरीचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयला अटक, ४.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Theft of laptops from a Flipkart warehouse uncovered


By nisha patil - 10/24/2026 10:28:45 PM
Share This News:



फ्लिपकार्टच्या गोदामात लॅपटॉप चोरीचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयला अटक, ४.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापुरातील निर्माण चौक परिसरात असलेल्या फ्लिपकार्टच्या गोदामातून लॅपटॉप चोरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. अथर्व प्रफुल्ल शिंदे राहणार पाचगाव असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून चार लाख २३ हजार ६८१ रुपये किमतीचे चार लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

अथर्व शिंदे हा फ्लिपकार्टच्या गोदामात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. १० ऑक्टोबर रोजी त्याने कंपनीच्या गोदामातून नजर चुकवून एक लॅपटॉप चोरल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर विद्यानंद कामत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी अथर्व शिंदे याला अटक केली. त्याने गेल्या सहा महिन्यांत चार लॅपटॉप चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली.


फ्लिपकार्टच्या गोदामात लॅपटॉप चोरीचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयला अटक, ४.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त
Total Views: 11