बातम्या

*तालुक्यात बी. एस. एन. एल. असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था

There is B S N L in the taluka


By nisha patil - 11/17/2025 3:20:40 PM
Share This News:



*तालुक्यात बी. एस. एन. एल. असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था

*आजरा(हसन तकीलदार):-दुरसंचार निगममध्ये खाजगी कंपन्या आपला वरचष्मा करीत 5जी सारख्या सुविधा देत आहेत. परंतु आजही बी. एस. एन. एल. 2जी 3जी च्या पुढे जायला तयार नाही. स्पर्धेच्या युगात जर आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर ग्राहकांना विविध सुविधा उपलब्ध करीत योग्य आणि वेळेत सेवा सुविधा देणे गरजेचे आहे. परंतु बी.एस.एन.एल.ची कधी घरात तर कधी गावात रेंज नाही अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक कंटाळून इतर कंपन्याकडे आपला मोर्चा वळवताना दिसत आहेत.
     

जिओ, एअरटेल, व्ही.आय. एवढ्याच खाजगी कंपन्या सद्या भारतात सेवा देत आहेत. बी. एस. एन. एल. ही सरकारी कंपनी असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आपल्याला परवडणारे दर आहेत म्हणून नाईलाजाने बी. एस. एन  एल. वापरत आहेत. स्पर्धेला कोणी नसल्यामुळे बाकीच्या खाजगी कंपन्या आपल्या मनाप्रमाणे दर आकारत ग्राहकांची लूट करीत आहेत. पूर्वी आजीवन इन्कमिंग कॉल मोफत होते. आता मात्र इन्कमिंगसाठी मासिक दीडशेहेचा रिचार्ज मारवा लागत आहेत. प्रत्येक घरात किमान तीन ते चार मोबाईल आहेत त्यामुळे महिन्याला सर्वसामान्यांना हजार दीड हजारचे  फक्त मोबाईल सुरु ठेवण्यासाठी खर्च करावे लागत आहे. गोरगरिबांना परवणारे दर म्हणून बी. एस. एन. एल. कडे ग्राहकांचा ओढा होता परंतु रेंज नसल्यामुळे तसेच इंटरनेटचे स्पीड कमी असल्यामुळे ग्राहकांच्या मध्ये तिव्र नाराजी दिसून येत आहे. त्यातच परत रिचार्जचे दरही वाढवले आहेत.

मासिक 107₹चा प्लान बंद करून ग्राहकांची नाराजी ओढवून घेतली आहे. एकंदरीत सर्वसामान्य गोरगरिबांची सर्व बाजूनी लूट सुरु आहे. "जग चंद्रावर आणि बी.एस. एन. एल. डोंगरावर"अशी अवस्था आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गवसे सारख्या गावात साखर कारखाना, के.डी.सी.सी.बँक, सेवा संस्था, महाराष्ट्र बँक, दूध डेअऱ्या, शेतकरीसंघ, आय.टी.आय कॉलेज, हायस्कुल, सुसज्य ग्रामीण रुग्णालय, अशा अनेक मोठ्या संस्था असून सुद्धा गवसे भागात बी.एस. एन.एल. योग्य सुविधा देण्यास कुचकामी ठरत आहे.

वेळोवेळी तक्रारी देऊनसुद्धा अधिकारी आणि कर्मचारी याकडे लक्ष देत नाही असा ग्राहकांचा सूर आहे. दर सोमवारी वीज नसलेमुळे दिवसभर रेंज आणि इंटरनेट गायब असल्यामुळे सर्व कामे ठप्प असतात. शेवटी कंटाळून कारखाना व इतर संस्थानी एरटेलची सुविधा घेतली आहे. साखर कारखान्यात सद्या ऑनलाईनकामकाज सुरु असलेने ऊस स्लिप, ट्रक नोंद,वजन स्लिप,सेंटर कामगार कामकाज, अकाउंटिंग इ. कामे कॉम्प्युटरवर असलेने बी. एस एन. एल. ची रेंज नसलेने एअरटेलची सुविधा घेतली असलेचे समजते. अशीच अवस्था दुसऱ्या संस्थामधूनसुद्धा पहावायास मिळत आहे. दुरसंचार विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन 5जी सारख्या सुविधा सुरु करून दर ही आवाक्यात ठेऊन सर्वसामान्यांना योग्य सेवा देणे गरजेचे आहे. नाहीतर एक दिवस याचेही खाजगीकरण होईल आणि कामगार देशोधडीला लागतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.


*तालुक्यात बी. एस. एन. एल. असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था
Total Views: 51