बातम्या
सातवे येथे कुंभार समाजाच्या आकर्षक गणेश मूर्तींना मोठी मागणी
By nisha patil - 8/27/2025 12:09:51 PM
Share This News:
“सातवे येथे कुंभार समाजाच्या आकर्षक गणेश मूर्तींना मोठी मागणी”
सातवे येथे कुंभार समाजाकडून आकर्षक गणेश मूर्तींना उत्स्फूर्त प्रतिसाद
सातवे (ता. पन्हाळा), प्रतिनिधी – किशोर जासूद
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातवे (ता. पन्हाळा) येथील कुंभार समाजाने तयार केलेल्या आकर्षक व देखण्या गणेश मूर्तींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यंदा कुंभार समाजाने विविध आकार व आकर्षक डिझाईनच्या मूर्ती बनवल्या आहेत. या मूर्ती कलात्मक सौंदर्य, बारकावे आणि नजाकतीमुळे विशेष उठून दिसत आहेत. अल्प दरात उत्कृष्ट मूर्ती उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्य भक्तांना याचा लाभ होत आहे.
मूर्तींची खरेदी करण्यासाठी तसेच त्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. स्थानिक गावकऱ्यांच्या मते या मूर्तींची कलेतील गुणवत्ता आणि सुंदरतेमुळे यंदाच्या गणेशोत्सवात त्यांना विशेष मागणी आहे.
सातवे येथे कुंभार समाजाच्या आकर्षक गणेश मूर्तींना मोठी मागणी
|