राजकीय

खंजीर खुपसणाऱ्यांना थारा नाही!" – नंदिनी बाभूळकरांचा घणाघात

There is no end to those who stab with daggers


By nisha patil - 7/30/2025 3:32:34 PM
Share This News:



खंजीर खुपसणाऱ्यांना थारा नाही!" – नंदिनी बाभूळकरांचा घणाघात

 त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही" –नंदाताई बाभुळकर 

"मी काही संत नाही! व्यासपीठावर बसूनच आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आता कुठेही थारा मिळणार नाही!" — असं थेट आणि निर्भीड विधान राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी कानडेवाडीच्या बैठकीत केलं.

लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपतींसाठी झटणाऱ्या नंदाताईंनी आता स्पष्ट इशारा दिला आहे — "आमची वेळ आली, की त्यांनी विरोध केला! अशा गद्दारांना त्यांच्या जागेवर बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही."

बैठकीत गोकुळ, जिल्हा बँक, व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार नंदाताईंना देण्यात आले. कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितलं – "आता कुणाशीही युती करा, पण गद्दारी करणाऱ्यांशी पुन्हा संगत नको!"असेही कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरवण्यात आलं मात्र नंदाताईंनी केलेले वक्तव्य नेमकं कोणासाठी याची मात्र सध्या चर्चा रंगली आहे


खंजीर खुपसणाऱ्यांना थारा नाही!" – नंदिनी बाभूळकरांचा घणाघात
Total Views: 56