राजकीय
भाजपचा हा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची जोरदार चर्चा
By nisha patil - 8/25/2025 12:13:41 PM
Share This News:
भाजपचा हा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची जोरदार चर्चा...
अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता
भाजपचे सहयोगी आमदार शिवाजीराव पाटील आणि भाजपचे विशेष कार्यकारी सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांच्यात शक्तिपीठ महामार्ग आंदोलनावरून संघर्ष उफाळला आहे. या पार्श्वभूमीवर कुपेकर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून या घडामोडींना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तरीदेखील कुपेकर यांच्या हालचालींमुळे चंदगडमधील राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०१९ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपमध्ये सक्रिय राहून त्यांनी महायुतीसोबत काम केले. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चंदगड मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही.
दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे चंदगड भाजपमधील अंतर्गत मतभेद आणखी गडद झाले आहेत. पुढील काही दिवसात कुपेकर यांनी जर निर्णय घेतलाच तर त्याचे राजकीय समीकरण काय असेल हे त्या काळातच कळेल.
भाजपचा हा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची जोरदार चर्चा
|