बातम्या
जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
By nisha patil - 8/25/2025 3:33:17 PM
Share This News:
जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोल्हापूर, दि.२५ : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि भविष्याचा विचार करून करण्याच्या सूचना दिल्या.
अंबाबाई मंदिर, जोतिबा, पन्हाळा विकास आराखडे, शेंडा पार्क आयटी पार्क, विमानतळ धावपट्टी विस्तार, शाहू स्मारक, कन्व्हेन्शन सेंटर, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती यांसह विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
कोल्हापूर महानगरपालिकेला अधिक निधी देण्याचे आश्वासन देत स्वच्छतेत आघाडी घेणाऱ्या पालिकांना जास्त निधी दिला जाईल, असे पवार यांनी सांगितले. इचलकरंजीच्या पाणीप्रश्न व जीएसटी परतावा निधीबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली.
समृद्ध शाळा उपक्रमाचे विशेष कौतुक करत प्रगतीशील गावांना प्राधान्याने योजना देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना निधीची कमतरता भासणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
|