बातम्या

महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास करणाऱ्या चोरट्यास अटक — कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

Thief arrested for stealing gold chain from woman


By nisha patil - 10/25/2025 5:54:08 PM
Share This News:



महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास करणाऱ्या चोरट्यास अटक — कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

कोल्हापूर (दि. २५ ऑक्टोबर) : दिवाळीच्या तोंडावर गांधीनगर परिसरात घडलेल्या सोन्याच्या चैन चोरीच्या गुन्ह्याचा अखेर उलगडा झाला असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तत्परतेने तपास करून आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹९०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

📅 घटना
दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रिटा अमरलाल वाघवा (वय ४२, रा. गांधीनगर, ता. करवीर) या महिला दिवाळीची खरेदी करून घरी परत जात असताना, पठाण डॉक्टर यांच्या दवाखान्याजवळील खाऊ गल्लीत पाठीमागून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४७४/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 पोलीसांची कारवाई
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार सो यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाची जबाबदारी दिली. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे व इतर अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेतला असता आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रितेश रविंद्र कंगणे (वय ३६, रा. शाहूनगर, हुपरी, ता. हातकणंगले) हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पथकाने प‌ट्टणकोडोली येथील केंद्रीय प्राथमिक शाळेसमोर सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीत सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

 जप्त मालमत्ता
आरोपीकडून ६.६०० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि विवो कंपनीचा मोबाईल हँडसेट असा एकूण ₹९०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 ही कारवाई पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

पोलीस अधीक्षक  योगेश कुमार सो

अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार बच्चू 


 कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पो.उ.नि. जालिंदर जाधव, संतोष गळवे, पोलीस अंमलदार राजु कोरे, गजानन गुरव, वैभव पाटील, विशाल खराडे, अमित मर्दाने, महेश आंबी, अमित सर्जे, प्रदिप पाटील, संजय हुंबे, संतोष बरगे, सचिन जाधव, सतिश जंगम, सतिश सुर्यवंशी.

 गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीस अटक केल्यामुळे नागरिकांतून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचे कौतुक केले जात आहे.


महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास करणाऱ्या चोरट्यास अटक — कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई
Total Views: 36