बातम्या
आजऱ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! तांदूळ-ड्रायफ्रुट शॉपी फोडून १.५५ लाखांचा माल लंपास
By nisha patil - 11/23/2026 3:37:31 PM
Share This News:
आजऱ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! तांदूळ-ड्रायफ्रुट शॉपी फोडून १.५५ लाखांचा माल लंपास
प्रतिनिधी हसन तकीलदार आजऱ्यातील एमआयडीसीजवळ असलेल्या ए वन तांदूळ विक्री केंद्राची अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा कडी-कोयंडा तोडून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत चोरट्यांनी तब्बल १ लाख ५५ हजार ४०० रुपयांचे तांदूळ आणि ड्रायफ्रुट्स लंपास केले आहेत.
आजरा-आंबोली रोडवरील हॉटेल गारवा शेजारी अनिस रमजान नेसरीकर यांचे हे दुकान आहे. २१ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० ते २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी दुकानाच्या समोरील पत्र्याच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील तांदूळ आणि ड्रायफ्रुट्सची चोरी करून चोरटे पसार झाले.
या घटनेची नोंद आजरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिकलगार पुढील तपास करीत आहेत. या दुकानफोडीमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आजऱ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! तांदूळ-ड्रायफ्रुट शॉपी फोडून १.५५ लाखांचा माल लंपास
|