कृषी
किसान सभेच्या आंदोलनाचा तिसरा दिवस
By nisha patil - 9/1/2026 11:36:48 AM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):- अखिल भारतीय किसान सभेचे पंचायत समिती समोर बेमुदत ठिय्या आंदोलना सह आत्मक्लेश सत्याग्रही आंदोलन हे कारवाई होत नाही आणि फौजदारी गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे कॉ. संग्राम सावंत यांनी सांगितले.
आरळगुंडी ग्रामपंचायतीची सखोल चौकशी झाली नाही.दप्तर दिरंगाई होत आहे. यासाठी मंगळवार दि. 6 जानेवारी,2026 पासून भुदरगड पंचायत समिती कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभा या संघटनेच्या वतीने "बेमुदत ठिय्या आंदोलन" आरळगुंडीच्या विविध मागण्यांचा सखोल व बिनचूक सविस्तर अहवाल लेखी स्वरूपात संघटनेला मिळाला पाहिजे. याबाबतीत गटविकास अधिकारी यांनी चौकशी समिती नेमून ग्रामपंचायत आरळगुंडी ता. भुदरगड जि.कोल्हापूरच्या कारभाराची सखोल बिनचुक व सविस्तर चौकशी करून दोषींवर ताबडतोब कारवाई झालीच पाहिजे.
यासाठी आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भाऊ पवार,मनसे नेते युवराज येडूरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते संतोष मेंगाणे, तालुकाध्यक्ष धनराज चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष मायकल बारदेस्कर, तालुका उपाध्यक्ष उबाठा अशोक दाभोळे,मनसे तालुका अध्यक्ष अशोक पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड सम्राट मोरे, विश्वजीत पाटील,वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव सचिन भाऊ कांबळे,महिला आघाडी अध्यक्ष ऋतुजा कांबळे यांनी आंदोलनाला येऊन जाहीर पाठिंबा दिलेला आहे.
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भाऊ पवार म्हणाले, आरळगुंडी ग्रामस्थांवर जो अन्याय झाला आहे तसेच सीआरपी सुप्रिया देवेकर यांच्यावर झालेल्या अन्याय विरोधात नुसता पाठिंबा नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्यासाठी ही आंदोलन करणार आहे त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा नाही तर आम्ही सर्व पुरोगामी पक्ष संघटना या आंदोलनात ताकतीने सहभागी होणार.
मनसे नेते युवराज येडूरे म्हणाले की, ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारा विरोधात तुम्ही जो आवाज उठवला त्याबद्दल तुमचे अभिनंदन तुमच्या विरोधात कोणीही दडपशाही करत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही ताकतीने तुमच्या बरोबर राहणार आहे.भविष्यात हे आंदोलन तीव्र करणार आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते संतोष मेंगाणे म्हणाले, जिथे जिथे अन्याय आहे तिथे आम्ही असणार आहे लोकशाहीसाठी अशा आंदोलनाची निदान या काळात तरी गरज आहे त्यामुळे तुमच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यावतीने जाहीर पाठिंबा आहे आम्हीही तुमच्या आंदोलनात सहभागी आहोत असे त्यांनी सांगितले.
आंदोलनाच्या दरम्यान गट विकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव यांच्या दालनात काल दोन्ही आंदोलनाच्या संदर्भात बैठक झाली त्यावेळी ठामपणे जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही आणि चौकशी समिती कोणाकोणाची नेमली हे जाहीर होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असे कालच्या बैठकीत सांगण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी एस. ए. मुजावर,जी.जी. कांबळे,एस. एस. येरुडकर यांच्या सह उमेद अभियानाचे कर्मचारी गजानन भोसले, उज्वला पाटील, अस्मिता पाटील, निलेश डवरी हे अधिकारी तसेच दोन्ही ग्रामसेवक संघटनाचे पदाधिकारी आणि अखिल भारतीय किसान सभेचे समन्वयक संग्राम सावंत, सीआरपी सारिका देवेकर यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व आरळगुंडी ग्रामस्थ उपस्थित होते.मात्र त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही. फौजदारी गुन्हा दाखल तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही असे ठोस यावेळी सांगितले आहे.यावेळी
ॲड.दशरथ दळवी,मेघाराणी भाईंगडे ,धनाजी शेटके, युवराज पाटील, मारूती पाटील,उत्तम कांबळे,सुनिल जाधव, दयानंद पाटील, विनोद देवेकर,गीता पाटील,शाहूबाई देवेकर, मीना पाटील,बयाबाई पाटील, कृष्णा शेटके,रंजना पाटील, मारूती पाटील,अश्विनी कांबळे, सुप्रिया देवेकर, पुजा पाटील व आरळगुंडी ग्रामस्थ उपस्थित होते.
किसान सभेच्या आंदोलनाचा तिसरा दिवस
|