ताज्या बातम्या

कोल्हापूरच्या या उद्योगपतीने खरेदी केल्या तब्बल तीन रोल्स रॉयस

This Kolhapur businessman bought as many as three Rolls Royces


By nisha patil - 8/28/2025 12:40:17 PM
Share This News:



 कोल्हापूरच्या या उद्योगपतीने खरेदी केल्या तब्बल तीन रोल्स रॉयस...

तब्बल २७ कोटींचं जबरदस्त कलेक्शन


  बजेट कार्सची क्रेझ वेगळी असली तरी लक्झरी कार्सचं वेड काही औरच! कोल्हापूरचे उद्योजक संजय घोडावत यांनी एका दिवसात तब्बल ३ Rolls-Royce खरेदी करून खळबळ उडवून दिली आहे.

तब्बल २७ कोटींचं जबरदस्त कलेक्शन

घोडावत यांच्या ताफ्यात आता Cullinan Series II (₹10.5 कोटी), Ghost Series II (₹8.95 कोटी) आणि Spectre EV (₹7.5 कोटी) अशा तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. एकूण किंमत जवळपास २७ कोटी रुपये!
 SUV, सेडान ते इलेक्ट्रिक – Rolls-Royce तिहेरी धमाका

Cullinan Series II – जगातील सर्वात आलिशान SUV, Iguazu Blue रंगात

Ghost Series II – प्रीमियम लक्झरी सेडान, Bohemian Red रंगात

Spectre EV – Rolls-Royce ची पहिली इलेक्ट्रिक कार, Imperial Jade रंगात


 सोशल मीडियावर Rolls-Royceचा जल्लोष

या तिन्ही कार्ससोबत संजय घोडावत यांचा डिलिव्हरी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, कोल्हापुरकरांची चर्चा देशभर रंगली आहे.

 घोडावत ग्रुपचं साम्राज्य

संजय घोडावत हे Sanjay Ghodawat Group (SGG) चे चेअरमन असून, ऊर्जा, विमान सेवा, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत त्यांचा दबदबा आहे. तसेच ते Sanjay Ghodawat University चे अध्यक्ष आहेत


कोल्हापूरच्या या उद्योगपतीने खरेदी केल्या तब्बल तीन रोल्स रॉयस
Total Views: 330