शैक्षणिक
‘कॉसमॉस’ चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना यंदाचा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’ पुरस्कार
By nisha patil - 8/29/2025 5:40:40 PM
Share This News:
‘कॉसमॉस’ चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना यंदाचा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’ पुरस्कार
कोल्हापूर / प्रतिनिधी – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा २० वा स्थापना दिवस सोमवारी (दि. १ सप्टेंबर) उत्साहात साजरा होणार असून, यावर्षीचा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार’ कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना जाहीर करण्यात आला आहे.

हा सन्मान आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल सयाजीच्या मेघ मल्हार सभागृहात सकाळी १०.३० वाजता आयोजित समारंभात प्रदान केला जाणार आहे. यावेळी आदर्श शिक्षक, आदर्श सेवक, गुणवंत विद्यार्थी आदी पुरस्कारांचाही वितरण सोहळा पार पडणार आहे.
काळे यांनी महिलांसाठी विशेष कर्ज योजना राबवून १५०० हून अधिक बचत गटांना सहाय्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली कॉसमॉस बँकेला ‘सर्वोत्कृष्ट सहकारी बँक’ पुरस्कार मिळाला आहे.
समारंभाला डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व विश्वस्त पृथ्वीराज पाटील उपस्थित राहणार आहेत.
‘कॉसमॉस’ चे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना यंदाचा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’ पुरस्कार
|